प्रकाश नाईक,
तालुका प्रतिनिधी अक्कलकुवा
अक्कलकुवा : आज दि. 13 ऑगस्ट 2023 रोजी नंदुरबार येथे पदाधिकारी नियुक्ती सोहळाचे कार्यक्रम मदर टेरेसा हायस्कूल नंदुरबार येथे आयोजन करण्यात आले होते.या सोहळा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नंदुरबार सचिव पदी Adv. अॅड. सायसिंग वळवी यांची नियुक्ती करण्यात आली आहेत. सायसिंग वळवी हे धडगाव तालुक्यातील मांडवी बु. येथील रहिवासी आहेत. Adv. अॅड. सायसिंग वळवी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत. त्याबरोबरच धडगाव तालुकाध्यक्ष पदी Adv. सीना पराडके यांची नियुक्ती करण्यात आली आहेत. हे गोवऱ्या येथील रहिवासी आहे. व पुढील वाटचालीसाठी त्यांना देखील शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. ही नियुक्ती अमळनेरचे राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आली आहे.
या पदाधिकारी नियुक्ती सोहळ्याच्यावेळी अमळनेरचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अनिल पाटील, व त्यांच्या सोबत इतर नेते, राष्ट्रवादीचे काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते, व Adv. अॅड. सीना पराडके, Adv. अॅड. सायसिंग वळवी, आदी उपस्थित होते.