पांडुरंग नरवाडे
तालूका प्रतिनिधी, सेनगांव
सेनगांव: दि.13 ऑगस्ट आझादी का अमृत महोत्सव वर्षाचे औचित्य साधून ग्रामविकास व पंचायतराज विभागाने राज्य सरकारने दिलेल्या सूचनेप्रमाणे हर घर तिरंगा हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी.13 14 व 15 ऑगस्ट या दरम्यान सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी,आस्थापना,सहकारी संस्था,शैक्षणिक संस्था यांनी इमारतींवर व नागरीकांनी स्वतःच्या घरावर स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वजाची उभारणी करण्यात आली आहे.हिंगोली जिल्ह्यातही हर घर तिरंगा या मोहिमेतून 13 / 14 व 15 ऑगस्ट या दरम्यान शासकीय व निमशासकीय यंत्रणा, शैक्षणिक संस्था तसेच खाजगी आस्थापना व घराघरांवर नागरीकांनी स्वयंस्फूर्तीने राष्ट्र ध्वजाची उभारणी करण्यात आली.तसेच हिंगोली व वाशिम जिल्ह्याच्या बॉर्डरवर असलेसल्या पैनगंगा नदीवरील गणेशपुर बॅरेजवर सुद्धा तिरंगा अभिमाने अभिमानाने डोलत आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे गावो गावी खेड्या पाड्यात शहरांमध्ये तिरंगा अभिमानाने प्रत्येकाच्या घरावर डोलत आहे !