अनंता टोपले
तालुका प्रतिनिधी, मोखाडा
मोखाडा: मोखाडा तालुक्यातील जमीन माफिया वैभव नंदकुमार डाकवे यांनी मोखाडा तालुक्यातील मौजे चास या गावातील गट नंबर ६३/२ व ६३/४ या शेतजमिनीचे बोगस ऑनलाईन ७/१२ घडवून त्यानंतर त्या ७/१२ वर १,५०,०००/- रू सोसायटीचे कर्ज घेतले होते वरील बोगस प्रकरणा बाबत आझाद समाज पार्टीचे जिल्हा अध्यक्ष गणेश कलिंगडा यांनी आवाज उठवल्यानंतर तत्कालीन प्रांत अधिकारी जव्हार यांनी या बोगस प्रकरणाची सखोल चौकशी केली असता , सदर बोगस प्रकरण उघडकीस आल्या त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी वैभव नंदकुमार डाकवे यांचे विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रांत अधिकारी यांनी मोखाडा तहसीलदार यांना दिले होते.
परंतु मोखाडा तहसीलदार यांच्या कडून वैभव डाकवेवर होणाऱ्या कायदेशीर कारवाईबाबत होत असलेल्या दिरंगाईचे विरोधात दिनांक १५ ऑगस्ट २०२३ पासून अपर जिल्हाधिकारी पालघर, मुख्यालय जव्हार यांचे कार्यालयी उपोषणाला बसणार होते.परंतु उपोषणाला बसण्याचा आधीच वैभव दाकवे यांच्यावर मोखाडा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहितच्या कलम ४२०,४६५,४६८, व ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास मोखाडा पोलीस स्टेशन कडून चालू आहे.दरम्यान बोगस ७/१२ विरोधात आरोपी वैभव डाकवे यांच्या वर गुन्हा दाखल झाल्यामुळे मोखाडा तालुक्यातील असंख्य जमीन माफियांचे धाबे दणाणले आहेत
मोखाडा पोलीस ठाण्याकडून वैभव डाकवे यांच्या मुसक्या कधी आवळल्या जातील याची वाट आता मोखाडा तालुक्यातील जनता बघत आहे.


