विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : कालच निर्मल विदर्भ या वृत्त पत्रात बातमी प्रसारित करण्यात आली होती.तालुक्यातील चालगणी येथे काही शेतकऱ्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याची तक्रार उपविभागीय अधिकारी यांना निवेदनामार्फत देऊन 14 ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा दिला होता. उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाने यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत पाच लाख रुपये देऊन. 30 ऑगस्ट 2023 पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण केले जाईल असे आमदार नामदेवराव ससाने यांनी आपल्या लेटर पॅड वर लेखी आश्वासन दिले आहे. तरीही सदर गावकऱ्यांनी 14 ऑगस्ट रोजी चे उपोषण मागे घेण्याचे ठरविले आहे.आमदार नामदेवराव ससाणे आपल्या कामात किती कार्य तत्पर आहेत आज त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.