शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधि यवतमाळ
उमरखेड बिटरगाव(बू )पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दूरक्षेत्र ढाणकी या ठिकाणी मागील काही दिवसापासून अवैध धंद्याने चांगला जोर धरला आहे. मागील आठ ते दहा वर्षापासून बंद असलेले धंदे मागील एका महिन्यापासून जोमाने सुरू झाले आहेत. उमरखेड तालुका मागील झालेल्या अतिवृष्टीने अक्षरशः निस्तनाभूत झाला आहे अनेकांचे संसार उघड्यावर आले असून बऱ्याच कुटुंबामध्ये संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था सुद्धा नाही. अनेक ठिकाणी शेतात शेतमजुरी करून लोक या अवैध धंद्याच्या आहारी गेल्यामुळे आपल्या मुलाबाळांना उपासमारीच्या विळख्यात ढकलत आहेत. शेतकऱ्यांसमोर एक ना अनेक संकटी उभी असताना यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्याच्यामध्येच उमरखेड हा तालुका अति दुर्गम असून डोंगराळ भाग असल्यामुळे विकासापासून कोसो दूर राहिलेला आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कर्जापाई तसेच सततच्या नापिकीमुळे निसर्गाच्या लहरीपणामुळे आपले जीवन संपवले आहे याच्यातच भर म्हणून ढाणकी या ठिकाणी मटका जुगार दारू सिंधी यासारखे अनेक व्यवसाय जोमाने चालू आहेत. पोलीस प्रशासनाचे अक्षम दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे मागील अनेक दिवसापासून बंद असलेले हे अवैध धंदे मागील एका महिन्यापासून अचानक सुरू झाल्याने बिटरगाव या पोलीस स्टेशनचा नवीनच कारभार स्वीकारलेल्या ठाणेदार सुजाता बनसोड नेमकी यावर काय कारवाई करतात याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.


