महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी, भद्रावती
भद्रावती,दि.१३:-स्व. कालीदास अहीर हे निःस्वार्थपणे गरजुना मदत करणारे व्यक्तीमत्व होते असे प्रतिपादन विदर्भ प्रदेश अध्यक्ष केंद्रीय मानवाधिकार संगठन तथा भाजपा जिल्हा महामंत्री ओबीसी वरोराचे डॉ. अंकुश आगलावे यांनी स्व. कालीदास अहीर स्मृती निमित्त भव्य रक्तदान शिबीरात 12 ऑगस्ट रोजी जैन भवन पठानपुरा रोड, चंद्रपूर येथे आयोजित रक्तदान शिबीरात केले.सदर्हू रक्तदान शिबीरात केंद्रीय मानवाधिकार संगठन, श्री. गुरूदेव सेवा प्रचारक, छत्रपती संभाजी राजे सेना, आदिवासी संगठन तथा मुस्लिम संगठनाचे पन्नास हून अधिक पदाधिकारी व सदस्यांनी सहभाग घेवून रक्तदान केले.यावेळी डॉ. आगलावे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना स्व. कालीदास अहीर यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा उजाळा दिला. कमल स्पोर्टींग क्लबच्या माध्यमातुन अनेक उपक्रम राबवित गोरगरीबांची निःस्वार्थपणे सेवा दिली असल्याचे यावेळी सांगितले. ग्रामगीता तत्वज्ञान सक्रिय दर्शन मंदीर पंढरपूर चे उत्सव समितीचे अध्यक्षच्या वतीने स्व. कालीदास अहीर यांना विन्रम श्रध्दांजली
वाहण्यात आली.हंसराज अहीर, अध्यक्ष केंद्रीय मागास आयोग, यांनी जिल्हयातील वेकोलि प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा योग्य भाव मिळवून गरीब शेतक-यांना न्याय मिळवून दिल्याचे सांगितले यावेळी अहीर यांनी सामाजिक कार्याची दखल घेत डॉ. आगलावे यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार केला. डॉ. आगलावे यांच्या पुढाकारातुने अनेक रक्तदात्यानी रक्तदान केल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले.यावेळी भाजपाचे डॉ. भगवान गायकवाड, सुरेश महाजन, प्रा. टिपले, अमित नवले, गजानन पिंपळकर, योगेश वाळके, पिंटू मरस्कोले, राकेश तालावार, इरफान शेख माजरी, एम.पी.राव. रेड्डी बाबु, अजय रंगलाल तसेच भाजपाचे पदाधिकारी, गुरूदेव सेवा मंडळाचे प्रचारक व केंद्रीय मानवाधिकार संगठन, मुस्लिम संगठन, आदिवासी संगठनचे पदाधिकारी मोठया संख्येत उपस्थित होते.