दत्तात्रय बोरुडे
शहर प्रतिनिधी श्रीगोंदा
श्रीगोंदा तालुक्यातील बोरुडेवाडी येथे स्वामी समर्थ केंद्र पारगाव व क्रांती ग्रुप बोरुडेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने बालसंस्कार शिबिर हे दर रविवारी जिल्हा परिषद मराठी शाळा (जुनी) बोरुडेवाडी या ठिकाणी विनामुल्य चालवले जाते. यामध्ये जवळपास ४०-५० विद्यार्थी ३ ते १२ वर्ष पर्यंत चे सहभागी होत असतात. नवीन पिढी कितीही बुद्धिमान व गुणशाली असली तरी त्यांना योग्य संस्कारांची अत्यंत आवश्यकता आहे. हेच विचार करुन या शिबिरात लहान मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा तसेच त्यांना अध्यात्माची गोडी लागावी तसेच मुलांना चालु घडामोडी बद्दल माहिती दिली जाते, आई,वडील थोर मंडळी यांचा आदर करणे, योगासने, पर्यावरण, देशभक्ती या विषासंदर्भात मार्गदर्शन केले जाते अशी माहिती क्रांती ग्रुप चे श्री. काकाजी बोरुडे यांनी दिली. यासाठी स्वामी समर्थ केंद्र पारगाव येथील श्री.निलेश हिरवे आणी चि. आदित्य बोरुडे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.