संजय भोसले
तालुका प्रतिनिधी , कणकवली
शासनाच्या बदलत्या शैक्षणिक धोरणामुळे पुर्वी प्रमाणे आज वर्गात अध्यापन करताना, शिकवताना शिक्षकांना समाधान मिळत नसल्याची खंत शिक्षक भारती सिंधुदुर्गचे जिल्हा अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी जामसंडे येथील स्नेह मेळाव्यात व्यक्त केली. शिक्षक भारती देवगडचा स्नेहमेळावा देवगड तालुक्यातील श्रीराम मोरेश्वर माध्यमिक विद्यालय जामसंडेच्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय वेतुरेकर शिक्षकांना मार्गदर्शन करताना बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष तथा पतपेढीचे चेअरमन संजय वेतुरेकर, कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर, सचिव समीर परब, जिल्हा संघटक आकाश पारकर, उपाध्यक्ष सुनील जाधव,संचालक सुरेन्द्र लांबुरे, सत्यपाल लाडगावकर, शरद देसाई,प्रदीप सावंत, स्वप्निल पाटील, सौ.नाईक, सौ.शिरसाठ, श्री.मसुरकर, कणकवली तालुका अध्यक्ष प्रसाद मसुरकर, वैभववाडी तालुका अध्यक्ष श्री.कांबळे,मुख्या.श्री.कदम,
श्री.करडे, पर्यवेक्षक रावराणे, सुनील घस्ती,श्री.राजेश वाळके, जिल्हा पदाधिकारी श्री.तांबे, देवगड तालुका क्रीडा समन्वयक उत्तेरश्वर लाड, छात्रभारती राज्य अध्यक्ष रोहित ढाले सचिव सचिन बनसोडे व देवगड तालुका अध्यक्ष हेमंत सावंत, सचिव संजय खोचरे तसेच अन्य पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.स्नेहमेळाव्याचा शुभारंभ दिप प्रज्वलन करून तसेच माता सरस्वती आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले.मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत तालुका अध्यक्ष हेमंत सावंत यांनी केले तर प्रास्ताविक सत्यपाल लाडगावकर यांनी करताना तालुक्यातील शिक्षक भारतीच्या कार्याचा आढावा घेतला.त्यानंतर नुतन संचालकांसह देवगड तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेख कामगिरी केलेल्या शिक्षकांचा संघटनेच्यावतीने सन्माचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला दरम्यान नुतन संचालक सुरेंद्र लांबुरे,प्रदीप सावंत व श्रीम.नाईक यांनी सत्काराला उत्तर देताना शिक्षक भारती हाच जिल्हयात ब्रॅण्ड असल्यामुळे आमच्या सारखे अनेकजन पेतपेढीच्या निवडनुकीत सहज विजय मिळवू शकलो अशी प्रांजळ कबुली देत देवगड तालुका शिक्षक भारतीचे विशेष कौतुक केले. स्नेहमेळाव्यात मार्गदर्शन करताना जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत आडेलकर म्हणाले की, शिक्षक भारती हाच आपला परिवार,संघटनेत श्री.शिरकर सरांसारखी योगदान देणारे आणि संघटनेवर प्रेम करणारी अनेक माणसामूळे संघटना मोठी होत आहे.संघटनेतील नेतृत्वाला संघर्षाची धार असल्याने अनेक शिलेदार संघटनेसाठी झोकुन देऊन काम करतात म्हणून संघटना जिल्ह्यात अग्रस्थानी असल्याचे त्यांनी यावेळी अभिमानाने सांगितले.
विद्यार्थी गुणगौरव-
देवगड तालुका शिक्षक भारतीच्यावतीने तालुक्यातील सुमारे ४५गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. दरम्यान जिल्हा सचिव समीर परब, सेवानिवृत्त मुख्या.संजीव राऊत यांनी मनोगत व्यक्त केले तसेच छात्रभारतीचे राज्य अध्यक्ष रोहित ढाले यांनी मनोगत व्यक्त करताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुंबई विद्यापीठात सिनेटच्या छात्रभारती उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन गावकर व रुपेश बांदेकर यांनी केले.तर आभार आकाश पारकर यांनी मानले.हा स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी तालुका पदाधिकारी व शिलेदारांनी विशेष मेहनत घेतली.या स्नेहमेळाव्याला तालुक्यातीलमुख्याध्यापक, पर्यवेक्षक,शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच पालकांनी हजेरी लावली होती.


