विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड :मागील साठ वर्षात कोणीही केले नाही असे काम दि सात नोव्हेंबर 2022 श्री क्षेत्र कपिलधार येथे धर्मसभेच्या व्यासपीठावर प्रमुख शिवाचार्य आणि भाजपा प्रमुख नेते यांच्या उपस्थितीत रामदास पाटील सुमठाणकर यांनी भाजपा शासनाकडे जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापण् करण्याची मागणी केली होती. आणि त्याचा शासनाकडे अभ्यासपूर्ण वेळोवेळी पाठपुरावा हि केला होता.आज त्याच मागणीला यश आलं आहे.स्वातंत्र्यानंतर लिंगायत समाजासाठी जगतज्योती महात्मा बसवेश्वर महामंडळाची घोषणा करून 50 कोटी रु तरतूदही केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य सरकारचे व राज्याचे अर्थमंत्री तथा लोकनेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब याचे खूप खूप आभार व्यक्त केले होते. आज 9 ऑगस्ट क्रांती दिनी शासन निर्णय निघाला आहे.आज शासन निर्णय, महाराष्ट्र शासन
इतर मागास बहुजन कल्याण विभाग,शासन निर्णय क्रमांक महामं २०२३/प्र.क्र.२७/ महामंडळे
मोतीमहल इमारत चर्चगेट, मुंबई ४०० ०२० दिनांक ०९ ऑगस्ट, २०२३ अन्वये महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणिविकास महामंडळांतर्गत जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ उपकंपनीची (Subsidiary) स्थापनाकरण्यात आली.जगतज्योती महात्मा बसवेश्वर महामंडळाची लिंगायत समाजातील 300 पोटजातितील तरुणांना होणारे फायदे.सुशिक्षीत तरुणांना भविष्याच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय .लिंगायत तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न.सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार.
समाजाच्या आर्थिक,सामाजिक व शैक्षणिक प्रगतीस मोठा हातभार लागणार.समाजातील मागास असलेल्या घटकापर्यंत विशेषकरून बेरोजगार तरुणांनपर्यत पोहचून त्यांना सक्षम बनविणे.रोजगाराच्या व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून त्यानं अर्थिक बळ प्राप्त करून देणे. आर्थिकदृष्ट्या समाजाचा सामाजिक विकास घडवून आणणे.राज्याचे लोकनेते नेते मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब, मा बावनकुळे साहेब आपले मनस्वी आभार आणि अभिनंदन.मागील 60 वर्षात जे कोणीकेले नाही ते आपण आज केलात अश्या भावना व्यक्त केल्या .