संतोष भरणे
ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर.
इंदापूर.आज वार बुधवार, दिनांक 9ऑगस्ट 2023 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूरचे उपबाजार भिगवण (राशीन रोड लगत) बाजार आवारात जनावरे बाजार शुभारंभ मा. सभापती पुणे जिल्हा बँकेचे संचालक मा.आप्पासाहेब जगदाळे यांच्या शुभहस्ते झाला.उपबाजार भिगवण जनावरे बाजारात खिलार गाय,बैल,गिरगाय,जर्सीगाय, मुरा व पंढरपुरी जातीची म्हैस आशा जातीवंत जनावरांची आवक व विक्री मोठ्या प्रमाणात झाली.श्री तानाजी इंगळे राहणार लासुर्णे यांची जर्सी गाय पैलवान श्री नितीन माने,कुरवली यांनी रुपये 2 लाख 11 हजार या उच्चांकी किमतीला घेतली,तर श्री देशमुख पाटील यांची जर्सी गाय रुपये 1 लाख 5 हजार रुपयांना श्री नामदेव तके यांनी विकत घेतली.
बाजार समितीने जनावरे बाजार आवारात बंदिस्त वॉल कंपाऊंड, पिण्याचे पाणी,जनावरे धुन्यासाठी हौद, लाईट व्यवस्था,जनावरे उतरण्याकरिता धक्का, सुसज्ज प्रशस्त पार्किंग व्यवस्था,निवारा पत्रा शेड व शेड नेट,वृक्षारोपण या अनुषंगिक सुविधा उभारणी केली आहेत.जनावरे बाजारात जनावरे खरेदी करिता इंदापूर, बारामती,दौंड,अकलूज, कर्जत, श्रीगोंदा करमाळा या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात खरेदीददार उपस्थित होते.
जनावरे बाजार शुभारंभ प्रसंगी बाजार समितीचे मा. सभापती श्री आप्पासाहेब जगदाळे संचालक उपसभापती श्री.रोहित मोहोळकर मा.सभापती दत्तात्रय फडतरे श्री.मधुकर भरणे श्री संग्रामसिंह निंबाळकर श्री अनिल बागल श्री.मनोहर ढुके श्री. तुषार जाधव,श्री. संदिप पाटील श्री गणेश झगडेश्री संतोष काका वाबळेश्री.आबा देवकाते श्री दशरथ पोळ श्री सुभाष दिवसे श्री.संतोष गायकवाड,श्री.रोनक बोरा श्री महावीर गांधी तसेच भिगवण पोलीस स्टेशन चे एपीआय दिलीप पवारसाहेब बाजार समितीचे मा.सभापती व संचालक श्री.श्यामराव वाघ श्री. रंगनाथ तात्या देवकाते श्री परागभाऊ जाधव सरपंच भिगवण श्री.संजय देहाडे, तानाजी वायसे तुषार शिरसागर जयदीप जाधव, जावेद शेख रवींद्र सरडे, विष्णुपंत देवकाते राजेंद्र देवकाते पै. नितीन माने पोपटराव जगताप विजय पवार बाळासाहेब जगताप वालचंद थोरात सचिन जाधव, दिलीप पांढरे विलास वाघ मनोज निकम हरिभाऊ जाधव सतीश काळे महेश जगताप तसेच मोठ्या प्रमाणात शेतकरी व्यापारी खरेदीदार उपस्थित होते अशी माहिती सभापती श्री विलासराव माने यांनी दिली.तसेच या बाजारात शेतकरी व व्यापारी वर्गाला जास्तीत जास्त सुविधा देण्यात येतील व भिगवण बाजारात व्यापारी व शेतकरी वर्गाला कोणत्याही प्रकारची वर्गणी देणगी यापासून संरक्षण दिले जाईल अशी ग्वाही समितीचे माजी सभापती श्री आप्पासाहेब जगदाळे यांनी दिली तसेच बाजारात जातिवंत जनावरे खरेदी विक्रीस आणून समितीने दिलेल्या सोयी सुविधेचा लाभ घ्यावा असे आव्हान समितीचे सभापती उपसभापती व संचालक मंडळाने केलेले आहे यापुढे दर बुधवारी उपबाजार भिगवण येथे जनावरे बाजार सुरू राहील.