प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
मानवतरोड ते परळी या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण पुर्ण झालेले असताना राज्यसरकार च्या मंजुरीचा प्रस्ताव रेल्वेबोर्ड अध्यक्ष व रेल्वेमंत्री यांच्याकडे पाठवणेसाठी मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करणार असे अकोला स्थानिक स्वराज्य मतदार संधाचे आ.बाजोरिया यांनी मानवत येथे आले असताना मानवत नगरीचे भाग्यविधाते व युवा नेता डाॅ.अंकुश लाड यांच्या वाॅइटहाऊस मध्ये आयोजित सत्कार कार्यक्रमात सांगितले.
यावेळी आ.बाजोरिया यांच्या सोबत त्यांचा मुलगा परभणी व हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदार संधाचे आ.बिल्वजी बाजोरिया हे होते.या दोन्ही आमदारांचा सत्कार डाॅ.अंकुश लाड यांनी केले तर व्यापारी महासंधाच्या वतीने सुरेश काबरा, कृष्णा
बाकळे ,मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंकजराव आंबेगावकर,अनित मुदंडा,माजी नगरसेवक प्रकाश पोरवाल यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आपले विचार व्यक्त करताना आ.गोपीकिशनजी बाजोरिया म्हणाले.मानवत शहर विकासाचे शिल्पकार व शहर विकासाठी वेळोवेळी पाठपुरावा करणारे डाॅ.अंकुश लाड यांच्या प्रर्यत्नाने शहाराचा विकास होत आहे.स्थानिक स्वराज्य मतदार संधाचे आमदारांचा निधी हा नगरपालिकेच्या माध्यमाद्वारे खर्च केला जातो.मानवत शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे सांगितले.यावेळी महाराष्ट्र प्रवासी महासंधाचे परभणी जिल्हा अध्यक्ष के.डी.वर्मा यांनी 2016 मध्ये तत्कालिन बिहारचे राज्यपाल व मा.राष्ट्रपती रामनाथजी कोविंद हे दि.11/2/2016 रोजी पाथरी येथील साईबांबाच्या जन्मस्थळाचे दर्शनासाठी आले असतांना मानवतरोड ते परळी या नविन रेल्वेमार्गाच्या मंजुरीसाठी तत्कालिन रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांचेकडे आपल्यामार्फत प्रस्ताव पाठवणे साठीचे निवेदन देण्यात आले.या रेल्वेमार्गाचे पुर्ण सर्वेक्षण झाले यासाठी 922 कोटी रू खर्च येणार आहे.राज्य सरकारचा मंजुरी प्रस्ताव जोपर्य॔त रेल्वेबोर्ड अध्यक्ष व रेल्वेमंत्री यांच्या कडे पाठवले जात तो पर्य॔त हा रेल्वेमार्ग पुर्ण होणार नाही असे सांगितले असता तसेच रेल्वेमंत्री यांना आपल्या वतीने पत्र देण्यात यावे अशी मागणी केली असता.आ.बाजोरिया यांनी सांगितले यासाठी अगोदर भेटले असते तर हा प्रस्ताव पावसाळी अधिवेशनात मांडला गेला असता.या प्रस्तावित व मंजुर झालेल्या मानवतरोड ते परळी या रेल्वेमार्गाचा मंजुरी प्रत्साव मुख्यमंत्री यांचेकडे पाठवून येत्या हिवाळी अधिवेशनात हा प्रस्ताव मांडून पाठपुरावा करणार असे आ.गोपीकिशनजी बाजोरिया यांनी सांगितले.आपले
प्रास्ताविक मांडताना डाॅ.अंकुश लाड यांनी सांगितले आतापर्यंत जो विकासनिधी आला त्यातुन अनेक विकास कामे झालीत काही कामे प्रगतीपथावरआहेत. शहरविकासाठी आपले सहकार्य व अर्शिवाद कायम राहु द्या असे सांगितले.या वेळी मानवत कृषी उत्पन्न बाजार समितिचे सभापती पंकजराव आंबेगावकर, संचालक जुगल काबरा व माजी नगरसेवक, व्यापारी व
नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,संचलन अॅड.पांडे यांनी केले.


