अजय राठोड
तालुका प्रतिनिधी बाभुळगाव
बाभूळगाव : तालुक्यातील पहुर येथील रहिवाशि रमेश हरिदास बनारसे वय 35 वर्ष याने आज गुरुवारला दुपारी दोन वाजता स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.मृतक रमेश बनारसे याच्याकडे स्वतःची बोलेरो पिकप व्हॅन असून हे वाहन तो चालवत असे, एकुलता एक असलेला रमेश हा एकटाच घरी असल्याची संधी साधून त्याने स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचे आई-वडील दोघेही शेतात गेले होते. त्याला एक बहीण असून तिचा विवाह झाल्याने ती आपल्या सासरी आहे. रमेशने अचानकपणे टोकाचे पाऊल का घेतले याबद्दल उलघडा झाला नाही. त्याचा विवाह झाला होता मात्र काही दिवसातच घटस्फोट झाला. बाभुळगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.


