बिहारीलाल राजपूत
तालुका प्रतिनिधी भोकरदन
भोकरदन: भोकरदन तालुक्यातील मौजे आव्हाना येथे दिनांक ९ ऑगस्ट २३ रोजी, ग्रामसंसद कार्यालयात सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मेरी माटी मेरा देश या अभियानांतर्गत पंचप्रण शपथ घेतली,सर्वांनी मिळुन ग्रामविकास अधिकारी श्री बि.जी.सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक शपथ घेतली. त्यात (१)आम्ही शपथ घेतो की, भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करु.(२) गुलामीची माणसिकता मुळापासून नष्ट करु.(३) देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करु.(४) भारताची एकात्मता बलशाली करु आणी देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू.(५) देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्त्यवांचे पालन करु. अशा प्रकारे सामुहीक पंचप्रण शपथ घेतेवेळी आव्हाना ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.रेणुका राम दुधे सह सर्व सदस्य,केंद्रीय प्रा.शाळेचे मुख्याध्यापक श्री गुलाबराव उजागरे सह सर्व शिक्षक,श्री आत्मानंद विद्यालय आव्हाना चे मुख्याध्यापक श्री दिलीप नामदेव गावंडे सह सर्व शिक्षक,सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस, सर्व आशा वर्कर, माजी उपसरपंच श्री अरुण पा गावंडे, माजी ग्रामपंचायत सदस्य श्री समाधान साळवे, ग्रामपंचायत लिपिक श्री जयपाल बिहारीलाल राजपूत सह सर्व कर्मचारी, पशुधन पर्यवेक्षक श्री राजू बाबुराव गायकवाड तसेच सर्व शैक्षणिक, राजकीय, सामाजिक,आजी-माजी पदाधिकाऱ्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ नागरीक यांची उपस्थिती होती.उपस्थित नागरीकांचे श्री बि.जी.सुरडकर ग्रामविकास अधिकारी यांनी शब्दसुमनांनी स्वागत केले तर ग्रा.प.लिपीक जयपाल राजपुत यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते असे उपसरपंच श्री नामदेव राजाराम सरोदे यांनी दैनिक अधिकारनामा चे प्रतिनिधीशी बोलतांना सांगीतले.









