सय्यद रहीम रजा
तालुका प्रतिनिधी उमरखेड
महागाव (दि. 7 ऑगस्ट) श्रावस्ती बौद्ध विहार महागाव येथे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा महागाव तालुका शाखेच्या वतीने चिंतन शिबिर दि. 6 ऑगस्ट 2023 रोजी उपक्रम राबविण्यात आले होते.याप्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश खंदारे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणमहर्षी प्राचार्य मोहनराव मोरे, प्रमुख मार्गदर्शक रवी भगत, विषय मार्गदर्शक तालुका कोषाध्यक्ष किशोर आळणे केंद्रीय शिक्षक व भास्कर कांबळे केंद्रीय शिक्षक उमरखेड इत्यादींनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन तालुकाध्यक्ष प्रकाश खंडारे, उपाध्यक्ष संस्कार देविदास भगत, संरक्षण विभाग उपाध्यक्ष श्याम कांबळे, कोषाध्यक्ष किशोर आळणे, अनिरुद्ध मुरादे सरचिटणीस संस्कार, सचिव राहुल नरवाडे, अनिल वाठोरे, हनवते, खंदारे, महिला उपाध्यक्ष नीता रणवीर, संरक्षण महिला सचिव छायाताई खंदारे व इतर तालुका कार्यकारणीतील व ग्रामीण शाखेच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या शिबिराचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा सरचिटणीस आदरणीय अनिरुद्ध मुरादे यांनी केले तर
आभार प्रदर्शन राहुल नरवाडे यांनी मानले.त्रिशरण पंचशील गाथा घेऊन कार्यक्रम संपन्न करण्यात आला.यावेळी हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.


