रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा येथे गीतामोहन रेसिडेन्सी गणपती मंदिराच्या मागे ,शेगाव रोड तेल्हारा येथे वल्लभदास मोहनलालजी राठी परिवार वाडी अदमपूर द्वारे श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.गुरुवार दिनांक 10 ऑगस्ट 2023 पासून श्रीमद् भागवत कथे स सुरुवात होवून दिनांक 16 ऑगस्ट 2023 पर्यंत असणार आहे .कथेचं वेळ दुपारी 2 ते 6 हे असणार आहे. तर दिनांक 17 ऑगस्ट रोजी महाप्रसाद चा कार्यक्रम होईल. महायज्ञाचे पंडित .जयप्रकाशजी तिवारी लघु वृंदावनधाम यांच्या मधुर वाणी मध्ये भागवत कथेचं वाचन होणार आहे तेल्हारा परिसरातील सर्व भक्तगण यांनी या श्रीमद्भा भागवतचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आह.