दिपक मसुरकर
तालुका प्रतिनिधी, रिसोड
रिसोड : डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलग्नीत सुविदे फाउंडेशन अंतर्गत कृषी महाविद्यालय रिसोड येथील राष्ट्रीय सेवा योजना एकक अंतर्गत युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय यांच्या सूचनेला अनुसरून विद्यार्थि कल्याण विभाग डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि महाविद्यालय रिसोड येथील राष्ट्रीय सेवा योजना एकक अंतर्गत दिनांक 9ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2023 दरम्याने क्रांति दिनाचे औचित्य साधून मोठया प्रमाणात राबविणे नियोजित आहे.भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या मार्गदर्शाखाली 75 रोपट्याचे वृक्षारोपण संबंधित दत्तक गाव, वस्तीच्या ग्रामपंचायत परिसरामध्ये करने आणि न विद्यार्थी कल्याण विभाग डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या सूचनेला अनुसरून आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत “मेरा माटी मेरा देश” अभियान नियोजित असून कृषि महाविद्यालय रिसोड अंतर्गत वाशिम जिल्ह्यात राबविण्यात येत असून सदर अभियान मध्ये दिनांक 9ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सेवा योजना युनिट कृषि महाविद्यालय रिसोड अंतर्गत ग्राम करडा ता. रिसोड येथे भव्य रॅली काढून घरोघरी , सार्वजनिक ठिकाणी जावून भुमातेस नमन व विरांना वंदन करने, स्वतंत्र सैनिक, लष्करी अधिकारी, सैनिक यांना वंदन करने नियोजित आहे.सुविदे फाऊंडेशन कृषि महाविद्यालय रिसोड द्वारे आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत मेरा माटी मेरा देश पोर्टल वर राष्ट्रीय स्वयं सेवकांची नोंदणी, शिलाफल्कम, पंचप्राण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, विरो का वंदन, राष्ट्रीय ध्वजारोहण, कलश इत्यादी नाविन्यपुर्ण राष्ट्रभक्ती पर कार्यक्रम, प्रश्र्नमजुषा, वादविवाद स्पर्धा, सांस्कृतिक वारसा जोपासणारे नृत्य, नाटिका चित्रकला, रांगोळी देशाची अखंडता व सार्वभौम प्रशासन मध्ये एकटा अखंडित राहो या करिता वेग वेगळे राष्ट्रीय उस्तव साजरे होत आहेत. सदर मेरा माटी, मेरा देश मोहिमे करिता कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एम. अप्तुरकर , समन्वयक आर .एस. डवरे , डॉ.पि.जी.देव्हडे ,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी. प्रा.डी. डी. मसुडकर , प्रा. एल. बी. काळे, प्रा. एम.व्ही.जाधव , प्रा. आर. वाय. सरनाईक दिपक गायकवाड, विकास जोगदंड परिक्षा व शिक्षण विभाग कृषी महाविद्यालय रिसोड , राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक तथा इतर विद्यार्थी वर्ग समस्त कर्मचारी वृंद कृषि महाविद्यालय रिसोड यांच्या सहकार्याने मेरा माटी, मेरा देश अभियान यशस्वीपणे संपन्न होणे करीता नियोजपूर्वक वाटचाल करून अभियान यशस्वी करने हेतू प्रयत्नशील आहेत.


