शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधि यवतमाळ
भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा आदिवासींना संविधानाने दिलेली पाचवी सहावी अनुसूची लागू झालेली नाही,भारतातील सगळ्यात बहुसंख्य असणाऱ्या ओबीसी ची अद्याप जनगणना झालेली नाही,
सरकार समान नागरी कायद्या सारखे एस. सी., एस.टी., ओबीसी विरोधी कायदे आणून तमाम मूलनिवासी बहुजनांचे प्रतिनिधीत्व नष्ट करण्याचे षडयंत्र करीत आहे.
अशा विविध कारणांमुळे सरकारच्या बहुजन विरोधी धोरणाच्या विरोधात,तसेच मणिपूर घटनेच्या हिंसेच्या विरोधात राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद या राष्ट्रव्यापी संघटनेच्या माध्यमातून आज दिनांक 07 रोजी देशभरात भारत बंद पुकारण्यात आला होता.
ह्या भारत बंद ला बामसेफ भारतमु मुक्ती मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.वामन मेश्राम साहेब यांचे समर्थन लाभले होते.ह्या अंतर्गत आज दि.7 ऑगस्ट रोजी ढानकी बंद चे आयोजन करण्यात आले होते. ओबीसी ची जनगणना झालीच पाहिजे,एस.सी., एस.टी., ओबीसी भारत के हैं मूलनिवासी,ओबीसी विरोधी बिजेपी सरकार चा निषेध असो अश्या घोषणांनी शहर दणाणले होते.
राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे तालुकाध्यक्ष सूरज मोरे यांच्या नेतृत्वात व बी.एम.पी. हिंगोली लोकसभा प्रभारी वर्षाताई देवसरकर यांच्यासह विद्वान केवटे राष्ट्रीय महासचिव भारतीय युवा मोर्चा यांच्या सहनेतृत्वात ही रॅली
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास हार अर्पण करीत सुरु होऊन ,अहिल्यामाई होळकर यांच्या प्रतिमेस हार अर्पण करीत मुख्य चौकात दाखल झाली.केंद्रातील सरकार हे आदिवासी विरोधी सरकार आहे.आम्ही ह्या सरकारला कदापि मतदान करणार नाही”,अशी शपथ घेऊन सूरज मोरे यांनी सरकार चा जोरदार निषेध केला.
तर भारतीय युवा मोर्चाचे विद्वान केवटे यांनी, “आमच्या समस्या निर्माण करणारी ब्राम्हणवादी व्यवस्था असून आम्हाला हिंदू मुस्लिम च्या नावाखाली दंगलीत वापर करुन भांडणे लावण्याचा काम करीत आहे.यापासून युवकांनी सावध राहायला हवे.आणि आदिवासी,ओबीसी विरोधी केंद्र,राज्य सरकारला सर्व जाती धर्मातील बहुजनांनी एकत्र येऊन EVM च्या विरोधात आवाज उठविल्याशिवाय आपल्या एकही समस्येचं समाधान होणार नाही,”असे आव्हान केले.BMP च्या वर्षाताई देवसरकर यांनी या मोर्चास आपला पाठिंबा जाहीर करत आदिवासींवर होणाऱ्या आत्त्याचाराचा निषेध व्यक्त केला.यावेळी राष्ट्रीय किसान मोर्चा चे पुंजाराम हटकरे यांनी शेतकरी संघटनेच्या वतीने,संतोष पाटील चद्रवंशी यांनी छत्रपती क्रांती सेना द्वारे तर अमोल पाटील व अत्तदिप धुळे यांनी भारतीय विद्यार्थी युवा बेरोजगार मोर्चा तर्फे आपले समर्थन घोषित केले.यावेळी राष्ट्रीय ओबीसी मोर्चा,राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ,भारतीय विद्यार्थी मोर्चा,राष्ट्रीय गोर बंजारा क्रांती संघ,राष्ट्रीय किसान मोर्चा, राष्ट्रीय लिंगायत मोर्चा,मौर्य क्रांतिसंघ यांसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी समर्थन व सहभाग दर्शविला.
सदर भारत बंद ची रॅली शहरातून अतिशय शिस्तीत , कायद्याचे पालन करीत निघाली आणि विद्यार्थी,युवा,बेरोजगार,शेतकरी, महिला एस.,सी., एस.टी.,ओबीसी बांधवांच्या मोठ्या उपस्थितीत अतिशय शांततेत संपन्न झाली.
या रॅलीतील घोषनांची परिसरामध्ये सर्वत्र विशेष चर्चा होत आहे.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संचालक प्रकाश कांबळे,मिलिंद चिकाटे,अमोल पाटील, हणवते साहेब,राज मुन्नेश्र्वर,दीपक चंद्रवंशी पाटिल,सुमित हापसे,इंदल राठोड, अभिषेक बगाटे, उज्वल लोणकर, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.