शेषराव तालुका
तालुका प्रतिनिधी,नांदुरा
कोलासर (ता.नांदुरा) येथे दि.06/08/2023वार रविवारला सायं. 8 वाजता गेल्या आषाढी पौर्णिमेपासून वर्षावासानिमीत्त सुरू असलेल्या पवित्र धम्म ग्रंथाला (भ. बुद्ध आणि त्यांचा धम्म) भारतीय बौद्ध महासभेच्या धम्मप्रचारकांनी सदिच्छा भेट दिली.सोबतच बौद्ध धम्मीय सभासद नोंदणी मोहीमही राबविण्याची सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी एक छोटेखानी कार्यक्रमही घेण्यात आला मात्र यावेळी गावातील उपस्थिती लक्षवेधी होती.नियमाप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात त्रिसरण पंचशीलाने करुन सांगता सरणत्तय गाथेने करण्यात आली.यादरम्यान ग्रंथाचे वाचन निव्रृत्ती मेढे खंडाळा यांचे हस्ते करून संघदास वाकोडे पि.खुटा धांडे , सुनील वाघ पि.खुंटा धांडे, अमोल मेढे खंडाळा,संदीप खंडेराव नारखेड, गजानन जाधव जवळा बाजार, संजय सपकाळ नायगाव यांनी वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन केले. या धम्ममय प्रसंगी प्रवेश वाघ अमर खंडेराव,रोशन खंडेराव नारखेड गौतम धुरंधर जवळा बाजार संदीप तायडे ग्रंथ वाचक, प्रकाश तायडे कोलासर हे उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मपाल वाघ पिं.खुटा धांडे यांनी व शैलेश तायडेकोलासरयांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोलासर येथील उपासक, उपासिका यांच्या उपस्थिती सोबत भोजन दानासाठी परिश्रमही महत्वाचे ठरले.