विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : यवतमाळ जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे दोन जिल्हा अध्यक्ष नेमले असून उमरखेड मतदार संघ हा पुसद जिल्ह्यात येत असून पुसद जिल्ह्यासाठी माधवराव सुपारे यांची नियुक्ती पक्ष श्रेष्ठींनी केली आहे .उमरखेड विधानसभा मतदारसंघ भाजपाने निर्माण केलेल्या पुसद जिल्ह्यामध्ये येतो त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जमाती प्रदेशाध्यक्ष माजी आमदार उत्तमराव इंगळे व माजी आमदार राजेंद्रनजरधने यांचे समवेत उमरखेड येथील कार्यकर्त्यांची भेट घेतली. अनेक दिवसापासून उमरखेड येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरुड पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात चार दुकाने पाडून त्या ठिकाणी करण्याचा निर्णय संघर्ष समितीच्या साडेचार वर्षातील विविध आंदोलनाने प्रशासनाने घेतला आहे. सदर प्रकरण भाजपाच्या काही नेत्यांनी माननीय उच्च न्यायालयामध्ये नेले होते .त्यामध्ये संघर्ष समितीच्या मागणीप्रमाणे माननीय उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. आता प्रशासनामार्फत राहिलेल्या एक दोन अडचणी सरकारला दूर करायला नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष महादेवराव सुपारे यांनी महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जमाती अध्यक्ष माजी आमदार उत्तमराव इंगळे व माजी आमदार राजेंद्रनजरधने यांच्या जबाबदारी दिली असल्याचं कळत आहे .येणाऱ्या काळामध्ये उमरखेड तालुका भाजप मधे फार मोठे बदल होणार असल्याचे संकेत दिसत आहेत .यावेळी संघ चालक आनंदराव चंद्र सुनील टाक किसनराव वानखेडे दुधेवार रणजीत रणमले तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.











