अतिश वटाणे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
सध्या सर्व महाराष्ट्रात डोळे येण्याची साथ सुरू आहे.हा आजार संसर्ग असून एकमेकांच्या संपर्कात आल्याने होत असल्याचं निदर्शनात आले आहे. 75 टक्के शाळकरी विद्यार्थ्यांना हा संसर्ग होत असून त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.म्हणून प्रहार जनशक्ती पक्ष संघटनेच्या वतीने बाळदी येथील शाळेतील मुख्याध्यापक डी.सी मनवर सर यांना लेखी स्वरूपाचे पत्र देऊन बाळदी शाळेमध्ये आरोग्य विभागाचे कॅम्प लावून विद्यार्थ्यांचे डोळे तपासणी करून त्यांचा योग्य उपचार करण्यात यावा अशी विनंती करण्यात आली आहे.यावेळी प्रवीण इंगळे, अविनाश दुधे,नितीन राठोड, दीपक ठाकरे,ओमकार हरण इत्यादी उपस्थित होते.


