शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधि यवतमाळ
ब्राह्मणगाव येथे ग्रामपंचायत च्या वतीने घेण्यात आलेल्या नेत्र तपासणी व उपचार शिबिराचे रिबीन कापून उद्घाटन कृषी महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. विजयराव माने यांचे हस्ते झाले यावेळी त्यांनी स्वतःची नेत्र तपासणी करून उपस्थित डॉक्टर मंडळीशी डोळ्याच्या साथीच्या आजाराबाबत चर्चा करून नेत्र रुग्णांच्या तपासणीला सुरुवात करून दिली.
या तपासणीसाठी नेत्र तज्ञ डॉ.टी ए. माने साहेब यांच्या मार्गदर्शनात डॉक्टर शैलेश बच्चूवार साहेब व त्यांचा चमू उपस्थित होता.
यावेळी ब्राह्मणगावचे प्रथम नागरिक श्री परमात्मा अण्णा गरुडे,अरविंद धबडगे, राजूभाऊ विनकरे, प्राचार्य प्रकाश पेंटेवाड,सुधाकरराव वानखेडे, तंटा मुक्ती अध्यक्ष अशोकराव निम्मलवाड, शाळा सुधार समिती अध्यक्ष दिगंबर दंडगे, उपसरपंच प्रतिनिधी संदीप गोरे, जनार्धन नलेवाड तसेच गावातील व परिसरातील नेत्र रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.