सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : दि. ०७ ऑगस्ट २०२३ बीड जिल्ह्यातील बीड मांजरसूंबा मार्गावर चालत्या गाडीत विधवा महिलेवर अत्याचार करण्यात आला असून बीड येथील शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले दिसत असून जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि गुन्हेगारांमध्ये वाढ झाली आहे यामध्ये जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. दि. ०४ ऑगस्ट २०२३ रोजी बीड शहरातील शिवाजी नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या महिलेचा पती कोरोना काळात मृत्यू पावला होता. या घटनेनंतर गेल्या वर्षभरात महिलेचे शहरातील एका व्यक्तीबरोबर संबंध होते.आणि गेल्या एक वर्षापासून हे दोघे बीड शहरात वास्तव्य करत होते. दि.४ ऑगस्ट २०२३ रोजी महिला बार्शी रोड मार्गे चालत असताना तिच्या प्रियकराने आणि त्याच्या मित्रांनी तिला जबरदस्तीने स्कारपीओ गाडीमध्ये बसवून गाडी मांजरसूंबा मार्गे घेऊन गेले असता बीड मांजरसूंबा मार्गावर चालत्या गाडीत या महिलेचा प्रियकर आणि त्याच्या मित्रांनी महिलेस मारहाण करून तिच्यावर अतिप्रसंग केला. त्यानंतर गाडी सात्रा पोत्रा याठिकाणी गेल्यानंतर प्रियकराच्या पत्नीने या महिलेस मारहाण केली. यामध्ये महिला जखमी झाली असून बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पिडीत महिलेच्या तक्रारीवरून बीड येथील शिवाजी नगर पोलिस ठाण्यात प्रियकर त्याचे दोन मित्र आणि एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.