अशोक गायकवाड
ग्रामीण प्रतिनिधी, ढाणकी
दी.4 ऑगस्ट रोजी बिटरगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत अवगत तीन कि.मी.असलेल्या करंजी गावामध्ये ठाणेदार सुजाता बनसोड यांनी 5 मे 2023 रोजी प्रभारी ठाणेदार असताना पहिली भेट दिली होती.व पोलीस स्टेशन बिटरगाव चे सूत्र हाती घेताच आज दी. 4 ऑगस्ट 2023 रोजी गावातील तंटामुक्त समिती यांनी शांतता बैठकीचे आयोजन हनुमान मंदिराच्या परिसरामध्ये केले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष वि. वी. सहकारी सोसायटीचे करंजी चे अध्यक्ष मा. माधव पाटील कलाने होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जीवन मस्के यांनी केले.ठाणेदार सुजाता बनसोड यांनी लगतच येणारे सण उत्सव जसे की गणेश चतुर्थी, दुर्गा उत्सव, विजयादशमी दसरा, यासारखे सण उत्सव येत असता, कायदा व सुव्यवस्था आणि शांतता कशी अबाधित राहील व जातीय सलोखा कसा निर्माण होईल यावर आपले मनोगत व्यक्त करत गावकऱ्यांना संबोधित केले.
गावामध्ये जे काही लहान सहान कारणावरून तंटे होत असतात ते गावातच मिटवले पाहिजे, त्यासाठी आपल्या गावात पोलीस पाटील व तंटामुक्ती समिती आहे. गावामध्ये जे अवैद्य धंदे जसे दारू, जुगार, मटका चालू असल्यास नागरिकांनी आपल्या हातात कायदा न घेता पोलीस स्टेशनला कळवावे. व त्यावर जे कोणी अवैद्य धंदे चालवीत असल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे स्पष्टपणे सांगितले. विद्यार्थी बांधवांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. मोबाईल कडे जास्त लक्ष न देता शिक्षणाकडे भर दिला पाहिजे.कारण चांगल्या गोष्टी आत्मसात करायला वेळ लागतो पण वाईट गोष्टी घ्यायला वेळ लागत नाही. म्हणून तरुण पिढीने आपले भविष्य आपल्या हाती समजून जीवन घडविण्यासाठी प्रयत्न करावा.यावेळी त्यांनी गावकऱ्यांकडून एकच अपेक्षा व्यक्त केली, गावात शांतता कशी नांदेल यासाठी सर्वांनी एकोप्याने राहावं लागलं एवढे सांगितले.
यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून पोलीस पाटील संगीता आनंदराव कलाने, सरपंच शिद्धोधन घुगरे, तंटामुक्ती अध्यक्ष शेख खाजा शेख भिकन, माझी तंटामुक्ती अध्यक्ष संतोष पाटील कलाने, ग्रामपंचायत प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते अरविंद पाटील कलाने, सामाजिक कार्यकर्ते साहेबराव जांभुळकर, गावातील सर्व संघटनेचे पदाधिकारी, बचत गटाचे महिला व ग्रामस्थ यदि उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भीमराव हापसे यांनी केले.त्यानंतर ठाणेदार सुजाता बनसोड यांनी गावांमध्ये आनंद बुद्ध विहार येथे जो वर्षावासानिमित्त बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा रोज वाचन चालू आहे. त्यावेळी भदंत पूज्य भिक्कु पट्टीसेन यांना फळ देऊन त्या वर्षावासानिमित्त बौद्ध बांधवांना मार्गदर्शन केले.