निशांत मनवर
शहर प्रतिनिधी, उमरखेड
उमरखेड : नागपुर- तुळजापूर महामार्गाच्या ढाणकी रोड उडाण पुलाच्या बाजुला बायपास वर मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकाना मोठा त्रास सहन करावा लागत आहे .काल सकाळी एक ट्रक गठाण घेऊन यवतमाळकडे जात असतांना खडडयामध्ये गेल्याने पलटी झाला. यामुळे वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाला असून उमरखेड ते वारंगा महामार्गाचे काम बंद पडल्यामुळे मागील 2 वर्षांपासून उमरखेडकर या समस्येमुळे त्रस्त आहेत. स्थानिक आमदार नामदेव ससाणे यांचे सुद्धा याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे.
कालच्या घटनेमुळे कोणत्याही प्रकार ची जीवीत हाणी झाली नाही असे सांगाण्यात येत आहे .संबंधीत विभागाने या रोडवर लक्ष्य देण्याची गरच आहे.