प्रकाश नाईक,
तालुका प्रतिनिधी अक्कलकुवा
अक्कलकुवा : धडगाव तालुक्यातील पाडली बोरकीपाडा येथील अंगणवाडी कार्यकर्त्या दुर्गा फुलसिंग वसावे ह्या दररोज अंगणवाडीत येत नसून आलेला पूरक पोषण आहार हा बालकांना तसेच किशोरवयीन मुलींना वाटप करत नाहीत तसेच बालकांना शिकवत सुद्धा नाही पूरक पोषण आहार हा स्वतःच्या घरी ठेवून स्वतः वापरत आहेत. यासंबंधी ग्रामस्थांनी विचारणा केली असता उलट उत्तरे देतात यासंबंधी मिऱ्याम वळवी आणि ग्रामस्थांनी अंगणवाडी सुपरवायझर चौधरी मॅडम यांना कळविले आहे परंतु काही सुधारणा झाली नाही उलट अंगणवाडी सुपरवायझर ह्या त्यांना पाठीशी घालत आहे. या विषयी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांना कळविण्यात आले आहे, परंतु कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही म्हणून आज दि. 6 ऑगस्ट 2023 रोजी धडगाव तालुक्यातील पाडली बोरकीपाडा येथील ग्रामस्थ आणि मिऱ्याम वळवी यांनी अंगणवाडी कार्यकर्ती व अंगणवाडी सुपरवायझरांना निलंबित करण्याची मागणी केली आहेत.
एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन देऊन वैयक्तिक लक्ष घालण्यासंबंधी निवेदन देण्यात आले आहेत.