शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधी, यवतमाळ
यवतमाळ : मागील अनेक दिवसांपासून शिवप्रतिष्ठान चे अध्यक्ष मनोहर भिडे हे वादग्रस्त वक्तव्यावरून चर्चेत असून त्यांच्या विरोधात उमरखेड शहरात पुरोगामी युवा ब्रिगेड आक्रमक झाली आहे.
महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी व देशाच्या तिरंगा व राष्ट्रागीता विरोधात संभाजी भिडे उर्फ मनोहर कुळकर्णी यांनी वादग्रस्त व अपमानस्पद वक्तव्य केली असून या निषेधार्थ पुरोगामी युवा ब्रिगेड ने उमरखेड च्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात संभाजी भिडे यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त केला.
भविष्यात देशाबद्दल व महापुरुषांबद्दल अपमानस्पद वक्तव्य जो कोणी करेल पुरोगामी युवा ब्रिगेड सहन करणार नाही असा निर्धार पुरोगामी च्या उपस्थित कार्यकर्त्यांनी या वेळी केला. यावेळी पुरोगामी युवा ब्रिगेड चे जिल्हा अध्यक्ष शिवशंकर सुरोशे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील लोखंडे,तालुका अध्यक्ष भागवत सूर्यवंशी, दत्ता वऱ्हाडे, परमेश्वर रावते पाटील, मनोज धुळध्वज, योगानंद जाधव, बाळासाहेब चंद्रवंशी, निकेश गाडगे, शाहरुख पठाण, विनोद वाढवे, अतुल वाढवे,राजू गायकवाड, ताहेर शाह, शहराध्यक्ष इरफान शेख, नागराज दिवेकर, शुभम जवळगावकर, शाम सोळंके ,सिद्धार्थ मुनेश्वर, प्रफुल्ल दिवेकर, गजानन सावतकर, चंदन सावते,दत्ता दिवेकर, संदीप मुकेवाड, सिराज खान, हिरासिंग जाधव,विठ्ठल कोंडामंगले, धनवान राठोड, महावीर जाधव आदी मोठया संख्येने उपस्थित होते.