दिपक मसुरकर
तालुका प्रतिनिधी रिसोड
दिनांक :३०/०७/२०२३ डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कृषी महाविद्यालय रिसोड येथील ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत दत्तक ग्राम मौजे देऊळगाव बंडा येथे कृषि दूत म्हणून कार्य करणारे विद्यार्थी अनिकेत बर्गे, गणेश डहाळके, अनिकेत दळवी, ज्ञानेश्वर देशमुख, विशाल डोंबळे, सचिन इडोळे यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत देऊळगाव बंडा येथे शेतकऱ्यांना युरिया,मीठ व गुळाचा वापर करून चारा प्रक्रिया कसा करावा व त्याचे फायदे काय आहे.याबद्दल माहिती देऊन प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी साधारण एक लिटर पाण्यात ५००ग्राम गूळ, २००ग्राम मीठ व १ ग्राम युरिया एकजीव करून १किलो वाळवलेल्या चाऱ्यावर शिंपडून मिश्रण केले. यावेळी गावचे प्रगतशील शेतकरी आणि इतर ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली . चारा प्रक्रिया करून गुरांना दिल्यामुळे त्याची पचनशक्ती वाढून त्यांना पोषकद्रव्ये मिळतात सदर प्रात्यक्षिक करिता कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एम. अप्तुरकर , विशेष तांत्रिक समन्वयक आर. एस. डवरे यांच्या मार्गदर्शनाखाली रावे कार्यक्रम समन्वयक प्रा.डी. डी. मसुडकर , कार्यक्रम अधिकारी प्रा. आर वाय सरनाईक व प्रा .डी टी .बोरकर यांच्या समन्वयाने प्रात्यक्षिक घेण्यात आले . विषय विशेषतज्ञ प्रा. कृष्णा देशमुख , प्रा. पुजा वलसे मैडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.