भारत भालेराव
ग्रामीण प्रतिनिधी, शेवगाव
शेवगाव: आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालय शेवगाव या ठिकाणी आज महसूल सप्ताह युवा संवाद व नव मतदार नोंदणी अभियान या अंतर्गत शेवगाव तहसील कार्यालयाच्या सहकार्याने नव मतदार नोंदणी अभियान संपन्न झाले.यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संपतराव दसपुते,उपप्राचार्या श्रीम रूपा खेडकर,पर्यवेक्षक प्रा शिवाजी पोटभरे ,शेवगावचे कामगार तलाठी किशोर पवार,मंडल अधिकारी श्रीमती सोनाली दहिफळे,शहरटाकळीचे कामगार तलाठी सुभाष वाघमोडे ,घोटणच्या कामगार तलाठी श्रीम सोलाट मॅडम,सेतू कार्यालयातील अधिकारी श्री दीपक म्हस्के,आप्पासाहेब बोडखे,अमोल सातपुते ,नोडल अधिकारी प्रा . अशोक तमनर आदी मान्यवर उपस्थित होते.शेवगावचे कामगार तलाठी किशोर पवार आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,महाराष्ट्र शासनाच्या वतीने १ऑगस्ट ते ७ ऑगस्ट हा महसूल सप्ताह म्हणून पार पाडला जातो .विविध शासकीय योजनांची माहिती समाजापर्यंत पोहोचवणे हा या पाठीमागील मुख्य उद्देश असतो याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी नव मतदार नोंदणी अभियान राबवले जात आहे तरी सर्व पात्र मुलांनी मतदार नोंदणी फॉर्म भरून घ्यावेत व या योजनेचा लाभ घ्यावा असे सांगितले.या अभियानांतर्गत कनिष्ठ महाविद्यालयातील पात्र विद्यार्थ्यांनी नव मतदार नोंदणी फॉर्म भरून घेतले तसेच ९०विद्यार्थ्यांनी डोमासाईल,नॉन क्रिमीलेअर, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तहसील कार्यालयाकडे जमा केली.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा अशोक तमनर यांनी केले.सूत्रसंचलन प्रा प्रतिमा उकिर्डे यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर लबडे यांनी केले.