सुशांत कदम
ब्युरो चीफ ठाणे
विरोधी पक्षनेते असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजप-शिवसेना सरकारमध्ये सामील झाल्यामुळे विधानसभा विरोधी पक्षनेते पदाची जागा रिक्त झाली होती.राष्ट्रवादीचं संख्याबळ घटल्याने विधानसभेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होईल, हे स्पष्ट झालं होतं. त्यानंतर आता काँग्रेसने निर्णय घेतला असून, विजय वडेट्टीवार हे यांच्यावर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.दुसरीकडे महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळासाहेब थोरात हे विधिमंडळ पक्षनेते पदी कायम राहणार आहेत.


