कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
ग्रिनपार्क श्रीरामपुर येथील विश्वदीप महाबोधी विहार समिती व सुजाता महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती मोठ्या ऊत्सवात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ महिला शांता खंदारे,प्रमुख अतिथी म्हणुन चंद्रकला पाईकराव पाईकराव उपस्थित होत्या.सुरवातीला प्रमुख अतिथींच्या हस्ते लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प अरपन करण्यात आले.याप्रसंगी शालु आळणे ,शिलादेवी मुनेश्वर यांनी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचे जिवनावर प्रकाश टाकला.शिला गवई,शांता खंदारे यांनी गित सादर केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक जया काळे यांनी तर आभार प्रदर्शन रंजना आडोळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता विश्वदीप महाबोधी विहाराचे अध्यक्ष धम्मभुषण साहेबराव गुजर ,सुधाकरराव बनसोड,के.के.दिघाडे,तुकाराम चौरे,प्रकाश आळणे,सोपानराव वैराळे,दगडूजी कांबळे व सुजाता महिला मंडळाच्या रमा दिघाडे,रत्नमाला शेंडे,सुजाता दवने,अनिता इंगोले,सुजाता बनसोड,मनकर्णा कांबळे,अनन्या बनसोड,चंद्रकला कांबळे,रंजना आळणे.वंदना गुजर,पंचफुला मनवर,एकता दांडगे,देवता बरडे महानंदा शेळके,सुजाता पाटील,वच्छला मनवर,आदींनी सहकार्य केले.











