विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड :उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार नामदेवराव ससाणे यांनी आज मत्खंदाचा दौरा करून नुकसानीची पाहणी केली.मागील काही दिवसांपासून उमरखेड तालुक्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मुंबई ला पावसाळी अधिवेशन चालू असल्यामुळे साहेबाला मुंबई ला जावे लागले होते ,परंतु काही लोकांनी आरोप केले होते.साहेब हेलिकॉप्टर उडाले की गायब झाले . तस काहीही नसून साहेबांनी त्यावेळेस काही ठिकाणी भेटी दिल्या होत्या . रहीलेल्या ठिकाणी आज मुंबई वरून परत येताच पूना मतदार संघात दौरा सुरू केला ,असून शेतकऱ्यांनी घाबरून जावू नये सरकार आपल्या पाठीशी आहे.सर्वांना सरसकट मदत केली जाईल शेतकऱ्यांना मदत मिळून देण्यासाठी नेहमी प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.