कैलास श्रावणी
तालुका प्रतिनिधी पुसद
मैनाक घोष यांची पंचायत समिती पुसद सभागृहात आढावा बैठक संपन्न यवतमाळ जिल्हा परिषदेचे, नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी काल दिनांक 26 जुलै 2023 रोजी पुसद पंचायत समिती येथे आले असता त्यांनी विविध विषयाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली.
सविस्तर वृत्त असे की,यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी नुकताच पदभार स्वीकारला तसेच ते पुसद दौऱ्यावर आले असता पंचायत समिती येथील सभागृहामध्ये, पं. स.पुसद गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग अभियंता, जि.प पाणीपुरवठा उपअभियंता, गृहशाखा अभियंता तसेच विविध विभागाचे पदाधिकारी कर्मचारी, सरपंच, उपसरपंच यांचे समवेत तालुक्यातील,प्रधानमंत्री घरकुल आवास योजना, जल जीवन मिशन,तसेच भारत स्वच्छता अभियान इत्यादी विषयाच्या अनुषंगाने सर्वच कामाच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी संवाद साधला.
प्रत्येक नागरिकांना आपल्याला हक्काचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार सर्वांना घरे हें प्रमुख उद्दिष्ट ठेवून घरकुल योजनेनुसार पात्र लाभार्थ्यांना विविध टप्प्यावर निधी दिला जातो. तसेच शासनाचे धोरण सुद्धा आहे.
परंतु संबंधित विभागास निधी उपलब्ध होऊन सुद्धा यंत्रणेचा समन्वय नसल्याने घरकुल योजनेचे उद्दिष्ट यशस्वी होत नाही ही बाब अतिशय गंभीर असून याबाबत अधिकारी व कर्मचारी यांनी योग्य समन्वय साधून घरकुल योजनेचे उद्दिष्ट वेळेवर पूर्ण करा व ही बाब गांभीर्याने घेऊन पुढील कामे कार्यान्वित करावी असे स्पष्ट निर्देश, मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनीआढावा बैठकीमध्ये बोलताना दिले.या वेळी उपस्थित असलेले सरपंच, सदस्य, उपसरपंच, यांनी घरकुल योजनेच्या संदर्भात अनेक समस्या असल्याचे लक्षात आणून दिले,विचारलेल्या संपूर्ण प्रश्नाचे व समस्येचे योग्य समन्वय साधून निराकरण केल्या जाईलं परंतु कोणत्याही परिस्थितीत घरकुल योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करा, तसेच येत्या काही दिवसात पुन्हा नवीन उद्दिष्ट आल्याने,घरकुल योजनेपासून वंचित असलेल्या लाभार्थ्यांना नवीन उद्दिष्टामध्ये समाविष्ट करा व सर्व योजनेचे उद्दिष्ट पूर्ण करा असेही ते शेवटी म्हणाले.या आढावा बैठकीला, प्रामुख्याने उपस्थित, जिल्हा परिषद यवतमाळ चे मुख्य कार्यकारी अधिकारी, मैनांक घोष,उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत जे ए आबाळे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास संस्था रसाळ मॅडम, प्रकल्प संचालक मोहिते मॅडम, ग्रामीण पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता काळबांडे, पुसद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय राठोड, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग अभियंता नांदुरकर, पाणीपुरवठा उपअभियंता कुमटे, एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचे एस पी माने, गटशिक्षणाधिकारी, आवटे मॅडम सरपंच संघटनेचे, आशिष काळबांडे, रणवीर पाटील, सामाजिक कार्यकर्ता शिलानंद कांबळे, तांडा सुधार समितीचे संजय आडे इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.


