संजय भोसले
तालुका प्रतिनिधी,कणकवली
कणकवली : सध्याच्या धावपळीच्या जीवनात व्यक्तीगत आरोग्याकडे लक्ष देणे शक्य होत नाही म्हणून शालेय जीवनातच क्रिडा स्पर्धा अतिशय महत्वाच्या असतात. शिक्षकांनीही दररोज व्यायाम करायला हवा तरच आपण तंदृस्तीचे बीजे आपण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सहज रुजवू शकतो असे प्रतिपादन कणकवली क्रीडा परिषदेचे अध्यक्ष तथा कणकवलीचे तहसीलदार आर.जे.पवार यांनी तालुक्यातील क्रीडा शिक्षकांना मार्गदर्शन करताना केले. कणकवली तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा नियोजन सभेत तहसीलदार बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर नायब तहसीलदार श्रीम.प्रिया परब-हर्णे, विस्तराधिकारी कैलास राऊत, कणकवली तालुका समन्वयक बयाजी बुराण, जेष्ठ क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड,विषयतज्ञ सचिन तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.सभेचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड यांनी केले तर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत बयाजी बुराण यांनी केले.त्यानंतर तालुका समन्वयक बयाजी बुराण यांनी शैक्षणिक वर्ष सन 2023/24 क्रीडा स्पर्धांची रूपरेषा वाचून दाखवली व सर्वानुमते तालुकास्तरीय 10 क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा ठिकाणे व तारीख निश्चित करुन वेळापत्रक जाहीर केले.मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सांघिक भावना निर्माण करण्यासाठी खेळ अतिशय महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी विस्तराधिकारी कैलास राऊत यांनी केले.याप्रसंगी स्पर्धा संदर्भातील तसेच ऑनलाईन नोंदणी संदर्भातील शिक्षकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.शेवटी बयाजी बुराण यांनी आभार मानले व अतिशय खेळीमेळीच्या वातावरण सभा संपन्न झाली.कणकवली तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा वेळापत्रक पुढीलप्रमाणे-
बुद्धीबळ: सर्व गट मुले/मुली 19ऑगस्ट 2023 रोजी स्पर्धा स्थळ-विद्यामंदीर कणकवली, फुटबॉल – सर्व गट मुले/मुली 30 ऑगस्ट 2023 रोजी स्पर्धा स्थळ-सेंट उर्सुला वरवडे, ज्युदो सर्व गट मुले/मुली 31ऑगस्ट 2023 रोजी स्पर्धा स्थळ-कासार्डे माध्यमिक विद्यालय,व्हालीबॉल-: सर्व गट मुले/मुली 2 सप्टेंबर 2023 रोजी स्पर्धा स्थळ- न्यु इंग्लिश स्कूल फोंडाघाट, कुस्ती :- सर्व गट मुले/मुली 4 सप्टेंबर 2023 स्पर्धा स्थळ- कासार्डे माध्यमिक विद्यालय,खो-खो-दि 8 सप्टेंबर 2023 रोजी14 वर्षाखीलील मुले-मुली आणि 19वर्षाखालील मुले व दि 9 सप्टेंबर 2023 रोजी 17 वर्षाखीलील मुले-मुली व 19वर्षाखालील मुली स्पर्धा स्थळ-कनेडी माध्यमिक विद्यालय,कॅरम- सर्व गट मुले/मुली दि.12सप्टेंबर 2023 रोजी स्पर्धा स्थळ-कनेडी माध्यमिक विद्यालय,कबड्डी:दि.14सप्टेंबर2023रोजी -14 वर्षाखीलील मुले-मुली आणि 19 वर्षाखालील मुले व दि 15 सप्टेंबर 2023 रोजी 17 वर्षाखीलील मुले-मुली व 19 वर्षाखालील मुली स्पर्धा स्थळ-खारेपाटण विद्यालय आणि मैदानी स्पर्धा:- दि.19ऑक्टोंबर 2023 रोजी14वर्षाखालीलमुले/मुली,दि.20ऑक्टोंबर 2023 रोजी 17वर्षाखालील मुले/मुली व दि.21ऑक्टोंबर 2023 रोजी 14 वर्षाखालील मुले/मुली स्पर्धा स्थळकासार्डेमाध्यमिकविद्यालय,क्रिकेट :- दि.31ऑक्टोंबर 2023रोजी सर्व गट मुले /मुली स्पर्धा स्थळ सेंट उर्सुला वरवडे असा कणकवली तालुकास्तरीय शालेय 10 क्रीडा स्पर्धांचा कार्यक्रम या सभेत निश्चित करण्यात आला.तालुका क्रीडा संकुल कधी होणार? गेल्या अनेक वर्षांपासून कणकवली तालुका क्रीडा संकुलाची मागणी क्रीडा शिक्षकांकडून वारंवार केली जाते आहे.आज झालेल्या सभेत पुन्हा सर्व क्रीडा शिक्षकांनी हा विषय ऐरणीवर घेत आमचा क्रीडा संकुलचा विषय कधी सुटणार? असा प्रश्न उपस्थित करून उच्चस्तरावरून प्रयत्न व्हावेत आणि आमचा हा प्रश्न कायमचा सोडवला जावा या आग्रही मागणीने जोर धरला. याशिवाय तालुक्यातील अनुक्रमे सर्व यशस्वी खेळाडूंना प्रमाणपत्र दिले जावीत अशी मागणी सर्व क्रीडा शिक्षकांनी तहसीलदारांकडे केली.त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देवून खेळाडूंना प्रमाणपत्र देण्याबाबत त्यांनी आश्वासन दिले.तर ऑनलाईन प्रवेशिका संबंधित शिक्षकांनी वेळेत भराव्यात असे आवाहन तालुका समन्वयक बयाजी बुराण यांनी आवाहन केले आहे.


