अभिजित यमगर
शहर प्रतिनिधी पुणे
बारामती चे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथक बारामती ,इंदापूर तालुक्यातील शाळांमध्ये भेटी देऊन विद्यार्थी नी मध्ये जागृती निर्माण करत आहे. याचाच एक भाग म्हणूंन निर्भया पथकातील सदस्यांनी ज्ञानदिप इंग्लिश मीडियम स्कूल ला भेट दिली या पथकामध्ये पोलीस हवालदार सदाशिव बंडगर, सुनिल धगाटे ,गणेश ढेरे ,राजेंद्र जाधव, यात महिला पोलीस मोहिनी ढमे,ज्योती जाधव यांचा यात समावेश होता!यावेळी त्यांनी निर्भया पथकाबद्दल मुलींना माहिती दिली व मुलींमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले,तसेच उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथक कसे काम करत आहे याबद्दल शिक्षकांना ही माहिती दिली!