माबुद खान
तालुका प्रतिनिधी जिंतूर
जिंतूर : तालुक्यातील कोक ते पिंपरी रोहिला या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे त्यामुळे या रस्त्यावरून जात असताना वाहनधारकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय. या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी यासंदर्भात येथील नागरिकांनी अनेक वेळा शासन दरबारी मागणी केली मात्र अद्याप हा रस्ता दुरुस्त करण्यात आलेला नाही.अखेर कंटाळून सदर रस्ता दुरुस्त करावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते इर्शाद पाशा चाँद पाशा यांच्या नेतृत्वात येथील नागरिकांनी आज या रस्त्यावर लोटांगण आंदोलन केले. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर सदर लोटांगण आंदोलन मागे घेण्यात आले. येत्या पंधरा दिवसात सदर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील लोटांगण आंदोलन म्हटले आहे


