विश्वास काळे
ग्रामीण प्रतिनिधी उमरखेड
उमरखेड : कृष्णपूर व परिसरात झालेल्या नुकसानीची भावी खासदार श्याम भारतीयांच्या कडून पाहणी.उमरखेड तालुक्यातील कृष्नापुर या गावाला लागून असलेल्या नाल्यावरील पुलाची मागणी मागील अनेक दिवसापासून गावकरी करत आहेत .पण त्यांची मागणी आत्तापर्यंत कुणीही दखल घेतली नाही.विशेष म्हणजे नाल्याच्या पलीकडे काही वस्ती असून त्या ठिकाणचे मुले शाळेत शिक्षण घेण्यासाठी कृष्नपुर या गावामधे येत असतात परंतु मागील काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे त्यांना शाळेसाठी येणे कठीण होऊन बसले आहे.त्या त्यांचे शैक्षणिक दृष्ट्या नुकसान होत आहे.या ठिकाणच्या नागरिकांना दवाखान्यात उपचार घ्यायचा असेल तर याच रस्त्याचा वापर करून जावे लागते.त्या मुळे कोणता जर गंभीर स्वरूपाचा आजार झाला तर त्यांना आपला जीव गमवल्याशिवय दुसरा कोणताही पर्याय नाही. अलीकडच्या लोकांची शेती नाल्याच्या पलीकडे असल्यामुळे त्यांना आपले जनावरे घेवून जाण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे.तरीही सरकारने या नाला रुंदी करण करून द्यावा अशी मागणी गावातील नागरिक करत आहेत.परंतु यांच्या मागणीची कुणीही दखल घ्यायला तयार नाही.स्थानिक लोक प्रतिनिधी च पूर्ण पणे दुर्लक्ष असल्याचं मत नागरिक व्यक्त करत आहेत.अश्या मध्ये आशेचा किरण म्हणून हिंगोली लोकसभेचे भावी खासदार म्हणून चर्चेत असलेले माहूर गडाचे योगी शाम भारती यांनी मी स्वतः या विषयी पुर्ण लक्ष लावून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे हा विषय मांडतो व प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न करतो असे आमच्या प्रती निधिशी बोलताना सांगितले आहे .