डॉ.शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी,परभणी
सेलू दि: 28 जुलै रोजी जिजामाता बाल विद्या मंदिर सेलू येथे तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप.क्रेडिट सोसायटी सेलू मार्फत शाळेतील इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शालेय वेलकम किटचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी तुळजाभवानी अर्बन बँकेचे शाखाधिकारी बाळासाहेब अनमुले, सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक मिलिंद दादा सावंत, बँकेचे रिलेशन मॅनेजर संजय भंडारी, लिपिक दीपक चरडकर, गणेश पवार, ज्ञानेश्वरजी बुरे, सय्यद कलीम, डासाळकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष -स्थानी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र पाठक हे होते.कार्यक्रमाची सुरुवात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजनाने झाली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवान पावडे यांनी केले, सामाजिक बांधिलकीतून तुळजाभवानी अर्बन को-ऑप. बँक प्रतिवर्षी विविध शाळांना शालेय साहित्य वाटप करत असते या त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती शाखा व्यवस्थापक बालासाहेब अनमूले यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. तसेच मिलिंद दादा सावंत यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या व पुढील वर्षी माझा देखील सहभाग या उपक्रमात असेल असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना शाळेचे मुख्याध्यापक श्री रवींद्र पाठक यांनी मान्यवरांचे आभार व्यक्त करून शाळेतील मुलांना या साहित्याची उपयोगिता व जपवणूक करण्या- विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मंगेश शेळके यांनी तर आभार कृष्णकांत खापरखुंटीकर यांनी मानले. याप्रसंगी शाळेतील श्री.विष्णू कटारे श्री.सुनील राठोड श्री. धनवे बाळू, सादेखा बाजी, तुकाराम अंभूरे यांनी परिश्रम घेतले.