रितेश टीलावत
तालुका प्रतिनिधी, तेल्हारा
तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी मोबाईल अॅपच्या सहाय्याने तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरून, आपल्या ७/१२ वर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे त्यामुळे खरीप हंगामाची ई – पीक पाहणी स्वतः करावी असे आवाहन तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांनी केले आहे.महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून राज्यभर राबविण्यात येत आहे. या ई-पीक पाहणी अॅपच्या माध्यमातून मागील रब्बी हंगामामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी १०० टक्के ई-पीक पाहणी करुन आपल्या पीकाची नोंदणी करुन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला आहे.त्यामुळे सद्यस्थितीत सुरु असलेल्या खरीप हंगामाची ई-पीक पाहणी देखील आपल्याला १०० टक्के पुर्ण करावयाची आहे. असे आवाहन तहसीलदार डॉ. संतोष येवलीकरयांनी केले आहे.खरीप हंगाम २०२३ पीक पाहणी नोंदणीसाठी ई – पीक पाहणीचे २.०.११ हे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे.खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी ०१ जुलै २०२३ पासून सुरु करण्यात आलेली आहे.तालुक्यातील सर्व मंडळातील शेतकरी बंधु-भगिनी, गावातील सरपंच, पोलीस पाटील , तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, कोतवाल, स्वस्त धान्य दुकानदार , महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष , बचत गट प्रतिनिधी , सहकारी संस्थाचे अध्यक्ष व सचिव, अध्यक्ष- शेतकरी दुध उत्पादक संघ , पाणी फाउंडेशन गट , पोकरा प्रतिनिधी , ग्रामरोजगार सेवक, तांत्रीक सहाय्यक , बँक प्रतिनिधी , शाळा व कॉलेज विद्यार्थी, प्रगतशिल शेतकरी , सर्व ग्रामपंचायत समिती, पंचायत समिती व जिल्हा परिषदचे सदस्य , मिडिया प्रतिनिधी, आपले सरकार सेवा केंद्र चालक यांनी देखील शासनाच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या ई-पीक पाहणी प्रकल्पात सहभाग घेवून शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्या साठी प्रोत्साहीत करावे असेही डॉ. संतोष येवलीकर यांनी सांगितले.तसेच शेतकरी बंधु- भगिनींना आवाहन करण्यात येते कि त्यांनी खरीप हंगाम २०२३ साठी दिलेल्या कालावधीमध्ये आपली ई- पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी जेणे करून शासनाच्या विविध योजना, पिक विमा, पिक कर्म, शासकीय अनुदान ई. विविध योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार आहे. तसेच खरीप हंगामाची ई-पीक पाहणी १०० टक्के पुर्ण करण्यासाठी विविध घटकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन तहसीलदार यांनी केले आहे.