माबुद खान
तालुका प्रतिनिधी, जिंतूर
जिंतूर : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या मणिपूर मधील विभत्स व वेदनादायी घटनेच्या विरोधात आदिवासी समाज व बहुजन समाजाच्या वतीने शहरातील बिरसा मुंडा चौक येथे काळे कपडे परिधान करून व काळे फीत लावून दि.२८ वार शुक्रवार रोजी बिरसा मुंडा चौक ते तहसील कार्यालय पर्यंत रॅली कडून आंदोलन करण्यात आले. मणिपूर राज्यात मागील दोन महिन्यांपासून दंगली सुरू आहेत, त्यातच दोन आदिवासी महिलांवर सामूहिक अत्याचार तथा नग्न करून त्यांची धिंड काढण्याचा घृणास्पद व्हिडिओ समोर आला. मानुसकीला काळीमा फासनाऱ्या या घटनेचे समाजमन हादरले असून जगात या घटनेने संताप उसळला आहे.मणिपूर येथे झालेल्या महिला अत्याचार प्रकरणी तेथील राज्य सरकार व केंद्र सरकार हे बघ्याची भूमिका घेत आहे. सदर प्रकरणातील संबंधित आरोपी विरुद्ध प्रशासन कसलीही कारवाई करत नाही. या प्रकरणाचा निषेध म्हणून जिंतूर तालुक्यातील आदिवासी समाज व बहुजन संघटनांच्या वतीने जिंतूर शहरात आज निषेध मोर्चा काढण्यात आला.शहरातील बिरसा मुंडा चौकातून आदिवासी व बहुजन समाज बांधवांच्या वतीने हातात काळे झेंडे व निषेधाचे फलक घेत शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला. सदर आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, या प्रकरणी मणिपूर सरकार कार्यवाही करत नसेल तर राज्यपालांनी ते सरकार बरखास्त करावे. अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मोर्चात महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या मोर्चाला तालुक्यातील विविध संघटनाने पाठिंबा दर्शीवला. त्यावेळी पोलीस निरीक्षक काकडे साहेब यांच्या आदेशाखाली पोलीस बंदोबस्त करण्यात आले त्यावेळी
एपीआय कोकाटे साहेब, सय्यद साहेब, पोले साहेब, हिवाळे साहेब, जिया पठाण, विठ्ठल कोकाटे साहेब, होमगार्ड मोसेब खान, इतर पोलीस कर्मचारी होमगार्ड उपस्थित होते.