विठ्ठल मोहनकर
तालुका प्रतिनिधी हिंगोली
हिंगोली :मागील काही दिवसांपासुन जिल्ह्यात होत असलेल्या पावसाने शेतकर्यांचे मोठ्या प्रमानात नुकसान झाले आहे .आद्याप पाऊस थांबलात नसल्याने अतोनात नुकसान होनारही आहे.आती पावसाने नद्याना नाल्याना पुर येत आहे ,रात्री झालेल्या पावसाने वसमत शहरातील बहुतांश घरांमध्ये पाणी शिरल्याने जिवनावष्यक वस्तु वाहुन गेले आहे .तसेचऔंढा तालुक्यातील लोहगाव येथील घरातील कर्ता पुरुष व भोसी येथील छोटेसे कुटुंब पालक महीला पुरात वाहुन गेल्याने मृत्यु पावल्याने हि कुटुंब निराधार झाली आहे .त्यांच्या कुटुबियाना कमीत कमी 10 लक्ष रु मदत म्हनून देण्यात यावी आशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदना मार्फत युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष बालाजी करडिले यांनी केली आहे.