शेख इरफान
जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ
यवतमाळ : उमरखेड/हिमायतनगर। विदर्भ मराठवाडा सीमेवरील हिमायतनगर – उमरखेड तालुक्याच्या मध्यभागातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील बोरी पुलावरून दि.२३ जुलै रोजी एका विवाहीत महिलेचा तोल जाऊन ती पैनगंगा नदिन पडून वाहून गेली होती. मात्र अद्याप शोध लागला नसल्याने परिसरात चर्चेचा विषय ठरला होता. पुराच्या पाण्यात तब्बल पाचव्या दिवशी वाहून गेलेल्या त्या महिलेचा प्रेत हिमायतनगर तालुक्यातील डोल्हारी परिसरात नदीकाठी पाण्यावर तरंगत असल्याचं आढळून आल्याची माहिती हिमायतनगरचे पोलीस निरीक्षक बि.डी. भुसनूर यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली. याची नोंद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितलेया बाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या काहि दिवसापासून हिमायतनगर तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे, तर सध्या धोंड्याचा महीना सुरू असून, हिमायतनगर तालुक्यातील मौजे वडगाव ज येथील विवाहित महिला ही पतीसह दोन चिमुकल्या मुलाना घेऊन विदर्भातील परजना येथे माहेरी गेली होती. येथून धोंड्याचे जेवण करून हिमायतनगर येथे येत असताना पैनगंगा नदीवरील बोरी पुलाजवळ पाणी पिण्यासाठी म्हणून थांबले होते. तसेच गंगामातेला धोंडे निवद सोडायचे म्हणून काठावर गेली असता पाण्याचा प्रवाह पाहून चक्कर आल्याने विवाहित महिला नदीत पडून वाहून गेली असल्याची खळबळजनक घटना घडल्याची चर्चा शहरासह तालुक्यातील गावागावात सुरू होती. यातील खरं काय त्याचा शोध पोलीस घेतीलविदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या पात्रात वाहून गेलेल्या विवाहित महिलेचा शोध गेल्या 5 दिवसापासून सुरू होता. दि २७ जुलै रोजी डोल्हारी येथील सरपंच तुकाराम माने यांच्या शेताजवळ नदीत वाहुन गेलेल्या त्या विवाहित महिलेची प्रेत आढळुन असल्याची माहिती हिमायतनगर पोलीसाना मिळाली. तात्काळ पोलीस निरीक्षक बी डी भुसनुर व त्यांची टीम घटनास्थळी पोचली. पंचनामा केल्यानंतर नदीत वाहून गेलेली विवाहित मयत सौ. माया अमोल पतंगे ही असल्याची खात्री पटल्यानंतर पतंगे कुटुंबातील सदस्यांना माहिती देण्यात आली. यावेळी प्रेत आढळुन आलेल्या घटनास्थळी हिमायतनगरचे पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनूर, डीएसबीचे कुलकर्णी, पोकॉ नागरगोजे यांनी उपस्थित होऊन प्रेत ताब्यात घेतले. विवाहित महिलेच्या प्रेताचे शवविच्छेदन करून नातेवाईकांना ताब्यात देण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.


