मधूकर केदार
तालुका प्रतिनिधी शेवगाव
मौजे गरड वाडी येथे कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत पौष्टिक धान्य बाजरी पीक शेतीशाळेचे आज दिनांक २७/७/२०२३ रोजी सकाळी हनुमान मंदिर गरडवाडी व प्रत्यक्ष बाजरी शेतावर आयोजित करण्यात आली. बाजरी पीक त्यावरील रोग व किड नियंत्रणाबाबत व मित्रकिड शत्रु कीड प्रत्यक्ष ओळख श्री. आर.व्ही.ढाकणे कृषी सहाय्यक यांनी करून दाखवली प्रधानमंत्री पिक विमा खरीप हंगाम सर्व पिकांचा विमा 31 जुलै 2023 पर्यंत सर्व शेतकरी बांधवांनी भरून घ्यावा. त्याबाबत आव्हान व कृषी विभागातील योजना महाडीबीटीबाबत सविस्तर मार्गदर्शन श्री एस जे होडशीळ कृषी पर्यवेक्षक यांनी केले. जयकुमार देशमुख यांनी आभार व्यक्त करून कृषी विभागाच्या योजना ची माहिती सर्व शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल याची ग्वाही दिली. उपस्थित शेतकरी बांधव विष्णुभाऊ गरड .ग्राम पंचायत सदस्य संजय केदार, रवी कनके, त्रिंबक गरड, विजय देशमुख ,शिवाजी देशमुख ,सिद्धार्थ गरड ,जनाबाई सानप ,गुंताबाई सांगळे ,सुरेखा केदार ,शोभा केदार, इत्यादी शेतकरी बांधव व महिला भगिणी उपस्थित होत्या.