रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा तालुक्यात, तालुका कृषी अधिकारी म्हणून नव्यानेच रुजू झालेले गौरव राऊत यांचा केळी उत्पादक शेतकरी संघटनेचे वतीने सत्कार करण्यात आला.
मागील अनेक वर्षापासून मंडळ कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले गौरव राऊत यांची तालुका कृषी अधिकारी म्हणून पदोन्नती झाली आहे. शेतकऱ्याचे सर्वात लोकप्रिय कृषी अधिकारी म्हणून नावाजलेले गौरव राऊत यांनी तालुका कृषी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला त्यामुळे त्यांचा शाल व श्रीफळ देवून स्वागत व अभिनंदन सोपान जवंजाळ, सचिन कोरडे पाटील राज्य समनवयक केळी संघ महाराष्ट्र राज्य, शंकर कोरडे, महेंद्र मते या शेतकऱ्यांनी केले.
यावेळी तालुक्यातील शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यावर भर देवून फक्त पारंपारिक शेतीवर अवलंबून न राहता शेतकऱ्यांनी शेती संबधित व्यवसायावर लक्ष केंद्रित करणे हे उद्दिष्ट पूर्ण करणार ,असे मनोगत तालुका कृषी अधिकारी गौरव राऊत यांनी व्यक्त केले.