फैय्याज इनामदार
तालुका प्रतिनिधी जुन्नर
उदापूर : श्री शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर या विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी उदापूर, डिंगोरे, मांदारणे, भैरवनाथ नगर, पिंपळगाव जोगा, मढ, नेतवड, गणेश नगर, आलमे, बल्लाळवाडी, कुमशेत येथील अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने जात आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना सकाळी सात वाजताच घराबाहेर पडावे लागत आहे सकाळी साडेसात वाजता बस बनकर पाट्यावर येते त्यात आधीच माणसे असल्यामुळे बसमध्ये बसण्यासाठी सोडाच साधे उभे राहण्यासाठी ही जागा ही भेटत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना बसमध्ये ताटकळत चेंगराचेंगरी करत प्रवास करावा लागत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे चांगलेच हाल होत आहे.
बनकर फाट्यावर बस आल्यावर ती आधीच गच्च भरलेली असते दुसरी बस साडेआठ ते नऊच्या दरम्यान येते त्या बसची वाट पाहिली तर कॉलेजला उशीर होतो आणि शैक्षणिक वर्षाचे नुकसान होते. नाईलाजाने चेंगराचींगरी करत याच बसमध्ये ताटकळत उभे राहून जावे लागत आहे काही विद्यार्थ्यांना तर उभे राहण्यासाठी जागा भेटत नाही बसमध्ये चढतानाच ढकलाढकली होत असल्यामुळे अनेक विद्यार्थी खाली पडून जखमी झाले आहे या गोष्टींचा मुलींना देखील नाहक त्रास होत असून शाळा, कॉलेजच्या वेळेमध्ये तरी एखादी वाढीव बस डेपोने चालू करावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
जुन्नरच्या महाविद्यालयात जाण्यासाठी सकाळी विद्यार्थ्यांची प्रचंड संख्या असते त्यामुळे बस मध्ये जागा होत नाही बस ड्रायव्हर व कंडक्टर यांचाही नाईलाज होतो आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होतात बस मध्ये जागा न मिळाल्यामुळे माझे तीन दिवस कॉलेजला गैरहजेरी लागली या होणाऱ्या मनस्तापामुळे मी काल मित्रांसह बस अडवली होती आज आम्ही विद्यार्थी मिळून महाविद्यालय वेळेपूर्ती एक-दोन दिवसात वाढीव बस चालू करावी नाहीतर विद्यार्थ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा लेखी अर्ज बस डेपोकडे दिला आहे.
गौरव शिंदे, विद्यार्थी बनकर फाटा.