कैलास खोट्टे
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर
शेतकरी नैसर्गिक आपत्तीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पीक विमा काढत आहेत. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्याने पीकविम्याची नोंदणी ठप्प झाली आहे. त्यामुळे आमचे सरकार केंद्र चालकांसह शेतकर्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.अतिवृष्टी,पूरपरिस्थिती यासारख्या नैसर्गिक आपत्तींपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने यावर्षीपासून पीक विम्यासाठी प्रति गट 1 रुपये प्रीमियम निश्चित केला आहे.पिक विमा काढण्यासाठी शेवटचे ३ दिवस शिल्लक राहले आहेत