प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
पाथरी शहरातील शिवाजीनगर येथील शांताबाई नखाते विद्यालयात बॉक्स लंगडी असोशिएशन ऑफ महाराष्ट्र तिसरी आमंत्रित १२ वर्षाखालील मुले मुली व १८ वर्षाखालील मुले मुली जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन,मंगळवार दि.२५ रोजी करण्यात आले या स्पर्धेचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव गीते यांच्या हस्ते करण्यात आले,
यावेळी व्यासपीठावर उद्घाटक म्हणून गटशिक्षणाधिकारी शिवाजी गीते यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणी जिल्हा असोशीएशनचे अध्यक्ष.अजिंक्य नखाते हे होते प्रमुख पाहुणे म्हणून पाथरी पोलीस ठाण्याचे एपीआय श्रीनिवास भिकाने ग्रामपंचायत सदस्य शुभम कणसे असोसिएशनचे सचिव भरत घाडगे मुख्याध्यापक एन इ यादव,प्राचार्य के एन डहाळे आधी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा मध्ये १२ वर्षा आतील १५ संघ तर १८ वर्षा आतील २० स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.१२ वर्षा आतील मुलींच्या संघामध्ये पाथरी तालुक्यातील पाथरगव्हाण बु. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रथम तर स्व. स.गो. नखाते माध्यमिक विद्यालय देवनांद्रा द्वितीय,शांताबाई नखाते प्राथमिक शाळा पाथरी तृतीय क्रमांक पटकाविला १२ वर्षाखालील मुलांमध्ये सर्वप्रथम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचरगव्हाण बु. पाथरी सर्व द्वितीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खुर्द तालुका पाथरी तर सर्व तृतीय स्व. स. गो. नखाते माध्यमिक विद्यालय देवनांद्रा या शाळेने यश मिळवले याप्रमाणे १८ वर्षा आतील मुले सर्वप्रथम तरुण संघर्ष क्रीडा मंडळ पाचरगव्हाण बु. सर्व द्वितीय शांताबाई नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाथरी सर्व तृतीय शांताबाई नखाते विद्यालय कासापुरी तसेच अठरा वर्षातील मुली सर्वप्रथम शांताबाई नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाथरी सर्व द्वितीय शांताबाई नखाते विद्यालय कासापुरी तालुका पाथरी तृतीय शांताबाई नखाते विद्यालय रामपुरी खुर्द यांनी क्रमांक पटकाविला वरील विजयी संघामधून राज्यस्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी संघ निवडण्यात येणार आहे, वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ परभणी संचलित शांताबाई नखाते विद्यालय रामपुरी खुर्द तालुका पाथरी येथे राज्यस्तरीय बॉक्स लंगडी स्पर्धेचे आयोजन ४ ते ६ ऑगस्ट या दरम्यान करण्यात आले आहे या राज्यस्तरीय स्पर्धेत सर्व निवड झालेल्या विजय खेळाडूंनी उपस्थित राहावे असे आवाहन परभणी जिल्हा बॉक्स लंगडी असोसिएशनचे उपाध्यक्ष तुकाराम शेळके यांनी केले आहे.जिल्हास्तरीय निवड स्पर्धेसाठी पंच म्हणून आर् एन पवार आत्माराम माने आकाश पवार किशोर जगताप मांदळे गंगाधर चव्हाण शंकर बरकुले प्रभाकर ठोके आदींनी काम पाहिले तसेच प्रभू शिंदे,पवन मोरे,धनंजय नखाते,रणधीर सोळंके,बी आर मुळे बडे राम शहाणे,सुरेश लहाने,अरविंद गजमल यांनी पुढाकार घेतला आभार प्रा. राजकुमार कांबळे यांनी मानले.