शेषराव दाभाडे
तालुका प्रतिनिधी, नांदुरा
बुलढाणा : जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा तालुक्यांमध्ये कपाशीची पाने लाल होऊन वाढत आहे. कपाशीची पाने लाल होऊन वाटण्यामागे बरीचशी कारणे असली तरी त्यामध्ये कपाशीच्या रूपा अवस्थेत हवामान बदलामुळे पडलेला अजैविक ताना मुळे व मुळावरील बुरशीजन्य रोगांमुळे झाडांची मुळे सडल्याल्यामुळे मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्याचे कमतरतेमुळे कपाशीची झाडे वाढ खुंटून लाल पडत आहेत. खालील कारणांमुळे कपाशी पिकांची पाने लाल पडून वाढ खुंटली असण्याची शक्यता आहे. कापसाची लागवड मे महिन्यात 15 ते 30 मे जमिनीत जास्त तापमान असताना फेरपालट न करणे कपाशी पिकाला पेरणी सोबत खताचा पहिला हप्ता न देणे ,हलक्या जमिनी त कापसाची लागवड करणे,दिवस व रात्रीच्या तापमानामध्ये तफावत ,ज्या शेतकऱ्यांनी भीती कापसाची लागवड 15 ते 31 मे दरम्यान केली असेल अशा शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर कापूस लाल पडण्याची प्रमाण जास्त आहे त्याचे कारणही तसेच आहे १५ ते ३१ मे च्या दरम्यान साधारणतः तापमान 38 ते 40°c पर्यंत होते आणि आपणास माहित आहे की जमिनीतील तापमान हे वातावरणाच्या तापमानापेक्षा दोन अंश सेल्सिअसने जास्त असते अशा तापमानात आपण कापसाची लागवड केल्यास जमिनीतील तापमान हे 42 अंश सेल्सिअस पर्यंत असते. तसेच आपण जेव्हा पाणी देतो तेव्हा जमिनीतील तापमान आणखी दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढते त्यामुळे कापसाच्या बियाण्यांना शॉक बसतो अशा परिस्थितीतही कापसाचे बियाणे उगवून येते परंतु कालांतराने त्याला शॉक लागल्यामुळे त्याची वाढ खुंटते व पाने खालून लाल होण्यास सुरुवात होते ,तसेच पांढऱ्या मुळ्यांना इजा होऊन त्या कुजल्यासारख्या होतात व त्यावर इतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.तसेच या दिवसात उष्ण वारे सुद्धा वाहत असतात त्याचा परिणाम सुद्धा कापूस पिकावर होतो.सदर कापूस पिकातील ही विकृती ही वातावरणातील बदल, जमिनीचे तापमान जास्त असताना केलेली लागवड, झाडांचे पांढरी मुळ्या कुजने मायक्रोफोमिना बुरशी ची लागण सूत्रकृमी व अन्न द्रव कमतरता हया सर्व घटकांचे एकत्रित परिणमामुळे दिसून येत आहे.
उपाय योजना – त्वरित शिफारशीप्रमाणे खतांची मात्रा द्यावी २.१३:००:४५ किंवा १९:१९:१९ ,१०ग्रॅम प्रती १०लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी किंवा नॅनो युरिया ४मिली प्रती लिटर प्रमाणे फवारणी करावी.कापूस पिकाला पांढरी मुळे फुटण्यासाठी हुमिक अँसिड 50मिल+कॉपरऑक्सीक्लोराईड ,४०ग्रॅम प्रती १०लिटर पाणी प्रमाणे ड्रेचींग करावी,तसेच सध्या परिस्थितीत बागायती कापूस पिकावर आकस्मिक मर येण्याची दाट शक्यता आहे.अकस्मिक मर रोगाची लक्षणे – झाडांची हिरवी पाने मलुल होऊन सुकतात.
उपाय योजना : अकस्मिक मर रोगाची लक्षणे दिसताच प्रादुर्भावग्रस्त झाडांच्या मुळाशी १५०ग्रॅम युरिया+१००ग्रॅम पोटॅश+४०ग्रॅम कॉपरऑक्सीक्लोराईड प्रती १०लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.शेतकऱ्यांनी यांची काळजी घ्यावी अशी माहिती विकास जाधव,वरिष्ठ शास्त्रज्ञसंजय म. उमाळे,शास्त्रज्ञ (कृषी विद्या)अनिल गाभने,शास्त्रज्ञ (पीक संरक्षण)
कृषि विज्ञान केंद्र, जळगांव जामोद यांनी दिली.


