कैलास खोट्टे
तालुका प्रतिनिधी संग्रामपूर
सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लाडनापूर येथील पांडव नदीवरील जळगाव अकोट रोडवरील पुलाचा काठ पाण्याने वाहून गेल्याची माहिती मिळताच नदीकाठावरील घरांची पडझड झाली असून शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार डॉ.संजय जी कुटे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री.फुंडकर साहेब यांनी घटनास्थळी येऊन पुलाची पाहणी केली व नुकसानग्रस्त शेतकर्यांचे लवकरात लवकर पंचनामे करण्याचे संबधित अधिकाऱ्यांना सांगितले. तो आमच्या सोबत आहे पण जीवितहानी होऊ नये यासाठी सर्वांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले.