रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
आज बाजारात उपलब्ध असलेल्या ग्रंथांपैकी बहुतांश ग्रंथ कर्मकांडाचा तर ; त्या खालोखाल उपासना अर्थातच भक्ती आणि फारच कमी प्रमाणात ज्ञानाचा पुरस्कार करणारे पाहण्याकरता मिळतात.याला अपवाद मात्र ग्रंथराज ज्ञानेश्वरी आहे कारण या ग्रंथामध्ये कर्म ज्ञान आणि भक्तीचा आजोळ संगम असल्याचे बारकाईने निरीक्षण केल्यास आपल्या निदर्शनास येते .असे अभ्यास पूर्ण मत ज्ञानेश्वरीचे निष्ठावान उपासक श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी मांडले. ते आज श्री संत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगड या ठिकाणी पुरुषोत्तम मासाचेऔचित्य साधून आयोजित असलेल्या ज्ञानसत्रातील चतुर्थ पुष्पगुंफित असताना बोलत होते. ते पुढे म्हणाले की ज्ञानेश्वरी ग्रंथाचेही विशेष आहे की ! त्यामध्ये कर्म आहे परंतु त्याची कटकट नाही . ज्ञान आहे परंतु त्यात ज्ञानाचारुक्ष पण नाही. सर्वसामान्य व्यक्तीला हसत खेळत ते ज्ञान आत्मसात होण्या साठी माऊलीने अनेक व्यवहारिक दृष्टांत दिले आहेत. याचा अर्थ त्यांनी व्यवहार शिकविला असे मात्र नाही . तर पार मार्थिक सिध्दांत पटण्या साठी त्यांनी अनेक दृष्टांताचा वापर करून ज्ञानातील रुक्षपणा कमी केला आहे . या ग्रंथामध्ये उपासना नाम भक्ती तर आहे परंतु ते देवतेला प्रसन्न करण्यासाठी कोंबड बकर बली देणाऱ्याभोळ्या अज्ञानाची नसून ; त्यात माऊलींनी तत्त्वज्ञानाला प्रेमाची माधुरी प्राप्त करून दिली आणि त्या भक्तीला ज्ञानाचा डोळा प्राप्त करून दिला आहे. आंधळ्याला जरी गरुडाचे पंख प्राप्त झाले तरी त्याला ते कोणत्या उपयोगाला पडतील ? त्याप्रमाणे मानवी जीवनात ज्ञानाशिवाय केलेल्या सत्कर्माचे श्रम केले असता ते व्यर्थच जातात . म्हणून सत्कर्म करणाऱ्याला ज्ञानाचा डोळा प्राप्त होणे अत्यंत गरजेचे आहे . अशाप्रकारे अनेक उदाहरण सांगून महाराजांनी उपस्थितांना ज्ञानेश्वरी ग्रंथाचे महात्म्य पटवून दिले . असे श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.