रितेश तीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
जिल्हाधिकारी निमा अरोरा आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी या दोघांचीही आज राज्य शासनाने बदली केली आहे . जिल्हाधिकारी यांची बदली डायरेक्टर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मुंबई या पदावर झाली असून त्यांच्या जागी अकोल्याचे जिल्हाधिकारी म्हणून अजित कुंभार हे येणार आहेत. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी सौरभ पटियार यांची बदली अमरावती जिल्हाधिकारी पदी झाली असून त्यांच्या जागी वैष्णवी बी ह्या नवीन सीईओ म्हणून रुजू होणार आहेत.